21/01/2023

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दिनांक :- 21/01/2023 💠 वार - शनिवार ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💥घडामोडी ● १९७२ - मणिपूर व मेघालय राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा 💥जन्म ● १८९४ - मराठी भाषेतील कवी माधव ज्युलियन ● १९२४ - माजी केंद्रीय मंत्री प्रा. मधू दंडवते ● १९१० - गीतकार शांताराम आठवले ● १९८६ - अभिनेता सुशांतसिंग राजपूत 💥मृत्यू ● १९४५ - भारतीय क्रांतिकारक रासबिहारी बोस ● १९६५ - अभिनेत्री गीता बाली *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 1⃣ *धनुष्यबाण आणि शिवसेनावरील सुनावणी संपली, सोमवारी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *248 शाळांची वीज बिलं थकली, महावितरणनं कनेक्शनच तोडले, जळगावमधील घटना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *एमपीएससीकडून मेगा भरती! तब्बल 8,169 पदासाठी निघाली जाहिरात, सर्वाधिक 7034 जागा लिपिक-टंकलेखक पदाच्या* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *लष्करात महिलांना समान संधी देण्यासाठी भारतीय लष्कराने लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असलेल्या 108 महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर पदोन्नती देण्याचा घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे-मिरज रेल्वेची दुसऱ्या मार्गिकेसाठी भूसंपादन पूर्ण; रेल्वे लाईनचे कामही अंतिम टप्प्यात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आज रायपूरमध्ये टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडचा दुसरा एकदिवसीय सामना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *📚गोष्टींचा शनिवार📚* *व्हिडीओ-लिंक👇* https://www.youtube.com/live/untIzKbSh4I?feature=share ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड* 📱9960217083 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लोभ म्हणजे अधोगती* माणसाच्या जीवनात अति लोभाने काय होते याचे विवेचन करणारा लेख ........ https://nasayeotikar.blogspot.com/2020/04/blog-post_17.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• सुशांत सिंग राजपूत  सुशांतसिंग राजपूत यांचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी झाला. हे एक लोकप्रिय भारतीय सिने-अभिनेता होते. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुशांतने २०१३ साली काय पो छे ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम पदार्पणासाठी स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून सुशांतने काही विशिष्ट हिंदी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत. छिछोरे या चित्रपटातील अभिनयाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात त्यांनी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची भूमिका केली होती. दिनांक १४ जून २०२० रोजी त्यांनी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याचे आढळून आले. संकलन ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• १) मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करतांना 'जसे गरुडाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ? २) एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा जगातील सर्वात युवा फलंदाज कोण ? ३) ९ जानेवारी २०२३ ला कितवा भारतीय प्रवासी दिवस साजरा करण्यात आला ? ४) केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र कोठे आहे ? ५) 'इंटर ऑफ इंटरप्राईजेस प्रकल्प' ही भारतातील कोणत्या राज्याची प्रमुख योजना आहे ? *उत्तरे :-* १) अण्णाभाऊ साठे २) शुभमन गिल, भारत ३) १७ वा ४) सांगोला, महाराष्ट्र ५) केरळ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*       👤 संतोष हेंबाडे, मुख्याध्यापक 👤 विजय माने 👤 कुलदीप सूर्यवंशी, संपादक, बिलोली 👤 पिराजी कटकमवार 👤 ऋषिकेश एस. पवार 👤 साईनाथ सायन्ना जगदमवार 👤 विष्णुरथ रावणगावकर 👤 कृष्णराज महानुभाव *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡••• ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• मना राघवेंवीण आशा नको रे। मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥ जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें। तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे॥१८॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।। ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *तहानलेल्या जन्मदात्यांना पाणी देण्यासाठी तळ्यावर आलेला श्रावण, दशरथाच्या बाणाला बळी पडला आणि पुत्रविरहाचा शाप मिळण्यास कारण ठरला. सिकंदर आणि नेपोलियन यांची जग जिंकण्याची 'तहान' अनेक युद्धांना सामोरी गेली आणि कित्येक राजे शरण जाऊन कफल्लक झाले. तहानलेले 'हरिण' वा 'पाडस' ही व्याघ्राची पोटापाण्याची सोय आहे. सत्तेची 'तहान'ही अशीच, त्यात महत्वकांक्षा मिसळली की व्याकूळ होते आणि सत्तापिपासू बनते. म्हणजे तहानेने विकृत रूप धारण केले की ती केवळ तहान न राहता 'जीवो जीवस्य जीवनम्' या तत्वाने तहानलेल्याला समोर दिसेल ते ग्रहण करण्याचे व्यसन लागते. अशावेळी चित्तवृत्ती बेभान होतात, ताळतंत्र सुटतो व विवेक संपून दुष्कृत्य घडते.* *'तृष्णा' म्हणजे 'तहान'च आणि 'तहान' पाण्याशिवाय पूर्ण होत नाही. ही साधी तहान जेव्हा 'तृष्णा' होते तेव्हा तिच्यातले विविध पैलू दिसू लागतात. तहानेत असलेले आसुसलेपण मात्र स्वतंत्र असते, केव्हा एकदाचे 'पाणी' मिळते, अशी अवस्था होते. ही अवस्था 'तृष्णे'मधून येते. तेव्हाही आसुसलेपण येऊन इच्छापूर्ती न झाल्यास बुद्धी किंवा मनाचा आधार घेतला जातो. मनाच्या आहारी गेल्यास महत्वाकांक्षा भरकटते व तृष्णा भीषण रूप धारण करते*                 ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●•• 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵       *श्री. संजय नलावडे, मुंबई*       *मोबाइल  - 9167937040* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• तुमची वाणी स्पष्ट,चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *स्वभाव* एक शेतकरी नेहमी शेजार्‍याचे धान्य चोरून नेऊन आपल्या घरात साठा करीत असे. त्यामुळे तो कोणालाही आवडेनासा झाला म्हणून देवाने शिक्षा म्हणून त्याला मुंगीचे स्वरूप दिले. त्यामुळे त्याचे रूप बदलले, परंतु दुसर्‍याचे धान्य चोरून नेऊन साठा करण्याची त्याची सवय मात्र बदलली नाही. तात्पर्य - कितीही स्थित्यंतरे झाली तरी माणसाचा मूळ स्वभाव काही बदलत नाही.  *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in •••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

10/03/2022

20/01/2023

13/02/2023