02/03/2023

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दिनांक :- 02/03/2023 💠 वार - गुरुवार ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💥 ठळक घडामोडी ● १९७२- अमेरिकेचे ’पायोनिअर-१०’ यानाचे गुरुच्या दिशेने उड्डाण झाले ● १८५७ - मुंबई येथे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स सुरू झाले 💥जन्म ● १९३१ - राम शेवाळकर, मराठी साहित्यिक ● १९२५: - शांता जोग, मराठी चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री 💥मृत्यू ● १५९८- संत मीराबाई. ● १९४९ - सौ. सरोजिनी नायडू. ● १९८६- डॉ. काशिनाथ घाणेकर. ● १७००- छत्रपती राजाराम महाराज. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 1⃣ *महाविद्यालयीन शिक्षकांचा 12वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी बोलावली शिक्षकांची बैठक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आजपासून दहावीच्या विद्यार्थ्यांची 'लढाई'; राज्यभरातील 533 केंद्रावर 15.77 लाख विद्यार्थी देणार परीक्षा दहावीच्या विद्यार्थ्यांची 'लढाई'; राज्यभरातील 533 केंद्रावर 15.77 लाख विद्यार्थी देणार परीक्षा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *फेब्रुवारीत जीएसटीमधून 1.5 लाख कोटींची वसूली; मागील वर्षाच्या तुलनेत 12 टक्क्यांची वाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *यंदाचा उन्हाळा घामटा काढणार, मार्च ते मे महिन्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता भारतीय हवामान विभागाने जाहीर केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *भारतातील बेरोजगारीचा दर 7.45 टक्क्यापर्यंत वाढला, ग्रामीण भागातील बेरोजगारीच्या दरात वाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा चटका... LPG सिलेंडर 50 रुपयांनी, तर कमर्शियल सिलेंडर 350 रुपयांनी महागला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पहिल्या दिवशीचा खेळ आटोपला, भारताला 109 धावांवर सर्वबाद करुन ऑस्ट्रेलिया 156/4, 47 धावांची घेतली आघाडी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🏆Class-7th English chapter 3.2 The Welcome🏆* *व्हिडीओ-लिंक👇* https://youtu.be/o_v-cyH7mGg ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड* 📱9960217083 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• आजपासून सुरू होणाऱ्या दहावी परीक्षार्थींना मनस्वी शुभेच्छा परीक्षेला जाता जाता ------- https://m.facebook.com/story.php?story_fbid=819051348221641&id=100003503492582&mibextid=Nif5oz लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राम शेवाळकर* कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई. वेदशास्त्रसंपन्न रामशास्त्री शेवाळकर हे राम शेवाळकरांचे पणजोबा, बाळकृष्ण काशीनाथ ऊर्फ भाऊसाहेब शेवाळकर हे त्यांचे वडील. त्यांनी पासष्ट वर्षे कीर्तनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. अशा घराण्यात जन्मल्यामुळे राम शेवाळकरांना संस्कृत साहित्याची आवड लागली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले. राम शेवाळकरांचा जन्म २ मार्च १९३१ रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर गावात झाला. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेडातील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून शिकवले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली. १९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात शेवाळकरांचा सहभाग होता. *संकलन* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• दुसऱ्याला सावली देणाऱ्या झाडाला मात्र उन्हात उभं राहावं लागतं. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• १) जगात तांदूळ उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो ? २) कवी कुसमाग्रजांचे मूळ नाव काय होते ? ३) भारताचा राष्ट्रीय गोड पदार्थ कोणता ? ४) जीवनसत्त्व ब -१२ चे रासायनिक नाव काय आहे ? ५) कोणता प्राणी सर्वात जास्त वेळ झोपतो ? *उत्तरे :-* १) दुसरा २) गजानन रंगनाथ शिरवाडकर ३) जिलेबी ४) सायनोकोबालमीन ५) सिंह *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*    👤 मीनाक्षी रहाणे, पुणे 👤 गणेश पाटील हतनुरे, पत्रकार 👤 बालाजी धारजने 👤 शेख जुनेद 👤 सुरेश मिरझापुरे 👤 संतोष कदम 👤 चक्रधर ढगे 👤 संभाजी सोनकांबळे 👤 आकाश पाटील ढगे 👤 अरुण भुरोड 👤 सुभाष नाटकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡••• ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• सदा बोलण्यासारिखे चालताहे। अनेकीं सदा एक देवासि पाहे॥ सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥४९॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।। ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लोकांनी आपल्या कार्यक्रमाला गर्दी करावी असं प्रत्येक कलावंताला वाटत असतं. लोक नाही जमले तर कलावंत नाराज होऊन संयोजकांना खडे बोल सुनावतात. कुमार गंधर्व एकदा म्हणाले होते, सभागृहात पाहून मी गातोच कुठं, मी आत पाहूनच गातो. लोक किती होते किंवा होते की नव्हते, याने मला काय फरक पडतो ? खरा कलावंत आत पाहून आपली कला सादर करतो. गायक स्टुडिओत रेकाॅर्डिंग करतात तेव्हा कुठे श्रोते असतात ?* *आपली आई जेंव्हा जात्यावर गाणं म्हणायची, तेव्हा कोण होता तीचा श्रोता ? कुणाकडं पाहून, कोणाच्या समाधानासाठी ती गाणं म्हणायची ? कुणाच्या टाळीची तीला आपेक्षा होती ? कुमार गंधर्व जसे आत पाहून स्वत: साठी गायचे तशीच जात्यावर गाणारी प्रत्येक आई त्या चार भिंतीच्या आत आणि गडद अंधारात जे गाणं म्हणायची ते गाणंच तिच्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा 'उजेड' होता. माणसानं त्या उजेडासाठी कविता म्हटली पाहिजे, गाणं गायलं पाहिजे.*                ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●•• 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵       *श्री. संजय नलावडे, मुंबई*       *मोबाइल  - 9167937040* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• जो माणूस वास्तव जीवनात समोर असणा-या कोणत्याही कठीन परिस्थितीशी धैर्याने आणि समर्थपणे टक्कर देऊन जीवन जगण्यास तयार होतो तोच जीवनात यशस्वी होतो.जर का त्याने तोंड नाही दिले तर त्याला त्याच्या जीवनात यशस्वी होणे कठीन जाते.म्हणून परिस्थिती कशीही असली तरी त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *मदत* शंकर एक गरीब घरातील मुलगा होता. एके दिवशी जंगलातून लाकडे गोळा करून तो परत येत असताना त्याला झाडाखाली एक म्हातारा माणूस बसलेला दिसला. तो खूप थकलेला आणि भुकेलेला होता. शंकरने त्याची विचारपूस केली. पण त्याच्याकडे त्या म्हातार्‍याला द्यायला अन्न द्यायला नव्हते. तो तसाच पुढे गेला. पुढे एक हरिण दिसले. त्याला तहान लागलेली होती. पण शंकरकडे पाणीही नव्हते. शंकरला खूप वाईट वाटले पण त्याचा नाईलाज होता. तो तसाच पुढे गेला. पुढे गेल्यावर त्याला एक माणूस भेटला. त्याला शेकोटी पेटवायची होती पण त्याच्याकडे लाकडे नव्हती. शंकरने त्याला आपल्याकडची थोडी लाकडे दिली. त्या माणसाने त्याला आपल्याकडचे थोडे अन्न आणि पाणी दिले. शंकर ते घेऊन मागे फिरला. त्याने हरणाला पाणी पाजले आणि उरलेले पाणी आणि अन्न घेऊन तो भुकेलेल्या म्हातार्‍या माणसाकडे आला. त्याला अन्न दिले. काही दिवस गेले. शंकर असाच लाकडे गोळा करायला जंगलात गेला. अचानक वाघ समोर आला. वाघ झेप घेणार इतक्यात एका हरणाकडे त्याचे लक्ष गेले. त्या हरणाला शंकरने पाणी पाजले होते. वाघ हरणाकडे पाहतो आहे हे पाहून शंकर उठू लागला तेवढ्यात तेथे एक वृद्ध माणूस आला. त्याने शंकरला उचलून सुरक्षित ठिकाणी नेले आणि त्याचे प्राण वाचवले *तात्पर्य*-आपण दुसर्‍याला मदत केली की आपल्यालाही मदत मिळते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in •••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

10/03/2022

20/01/2023

13/02/2023