03/03/2023
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 03/03/2023
💠 वार - शुक्रवार
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
💥ठळक घडामोडी
● ००७८- शालीवाहन शक सुरु
● १९९१- रेल्वे कर्मचाऱ्यांचे पहिले मराठी साहित्य संमेलन झाले
💥जन्म
● १८३९- जमशेदजी टाटा
● १८३९- टेलिफोनचा जनक ग्रॅहॅम बेल
● १८६०- प्लेग प्रतिबंधक लस शोधणारे डॉ. हापकीन
● १९२८- अख्तर हुसेन
💥मृत्यू
● ह.ना.आपटे.
● १७०७ : औरंगझेब, मोगल सम्राट.
● २००० : रंजना देशमुख, मराठी
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *भाजपचा पारंपरिक मतदारसंघ काँग्रेसनं हिसकावला; कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांचा मोठा विजय*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *त्रिपुरा-नागालँडमध्ये भाजपने गड राखला, मेघालयात एनपीपीची आघाडी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाकडून समिती गठीत, निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे समितीचे अध्यक्ष, सेबीला दोन महिन्यात तपास पूर्ण करण्याचे आदेश*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *रश्मी शुक्ला यांना बढती, सशस्त्र सीमा बल महासंचालकपदी नियुक्ती, केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पत्र जारी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *आर अश्विन बनला भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू, कपिल देव यांनाही टाकलं मागे*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *मार्च ते मे महिन्यात कडाक्याचे ऊन पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यातच आता हवामान विभागाने राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या तिसऱ्या इंदूर कसोटीत भारतीय संघावर पराभवाचं सावट, टीम इंडिया 163 धावांवर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियासमोर 76 धावाचं माफक लक्ष्य*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
*🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*🏆Class-7th English chapter 3.3 News Analysis🏆*
*व्हिडीओ-लिंक👇*
https://youtu.be/icm9oiUfCE0
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
*सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
परिक्षेपेक्षा जीवन महत्वाचे आहे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1914047385388693&id=100003503492582&mibextid=Nif5oz
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल
(३ मार्च १८४७, २ ऑगस्ट १९२२)
यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला.१८८५ मध्ये ते अमेेेरिकन टेलिफोन कम्पनीचे सह-संस्थापक सुद्धा होते.
बेल यांचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी एडिनबरा, स्कॉटलंड येथे झाला. त्यांचे आजोबा, वडील - अलेक्झांडर मेलव्हिल बेल आणि भाऊ या सगळ्यांचा मूक-बधिरांच्या शिक्षणाशी जवळचा संबंध होता. तर त्यांची आई आणि पत्नी या दोघीही कर्ण बधिर होत्या. लहानपणी अलेक्झांडर हे नाव ठेवण्यात तरी वयाच्या ११ व्या वर्षी स्वतःच्या नावात ग्रॅहॅम नाव टाकून घेऊन मग अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या नावाने पुढे ते ओळखले जाऊ लागले.
मूक-बधिरांसाठी शिक्षण सुलभ व्हावे, त्यांना इतरांचे बोलणे कळावे यासाठी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल सतत प्रयत्नशील होते. त्यासाठी बोस्टन विद्यापीठात स्वरयंत्राचे कार्यशास्त्र शिकविण्यासाठी नेमण्यात आले. तेथेच बधिरांसाठी यंत्र तयार करण्याचे प्रयत्न बेल करीत होते. असे यंत्र बनविण्याच्या पयत्नात बेल असतांनाच ते मेबल ह्यूबर्ड नावाच्या कर्ण बधिर मुलीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नीला बेलच्या यंत्राविषयी कळल्यावर तिनेच ओठांची हालचाल वाचता येणे हाच बधिरांसाठी कसा सर्वोत्तम पर्याय आहे हे पटवून सांगितले. मग बेल यांनी तसे यंत्र बनविण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्यातच दूरध्वनी यंत्राचे कोडे उलगडले.
बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले. दि. २ जून १८७५ या दिवशी आपले सहकारी वॉटसन यांच्यासह काम करीत असतांना दुसऱ्या खोलीतील वॉटसन यांच्या हाताच्या धक्याने ट्रान्समीटर थरथरला, तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला. मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटरचा उपयोग करून सहकारी वॉटसन यांना आपल्या खोलीत येण्याविषयी सांगितले. बेल यांचा तो संदेश सहकारी वॉटसन यांनी ऐकून तसा प्रतिसाद दिल्यावर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल दोघांची खात्रीच पटली. बेल आणि वॉटसन यांनी या यंत्रावर आणखी प्रयोग करून दि. १५-०२-१८७६ या दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा पेटंट कार्यालयातच बेल यांना समजले की अशाच प्रकारच्या प्रयोगासाठी आणखी चार अर्ज पेटंट कार्यालयात पडून होते. हे पेटंट युद्ध बराच काळ सुरू होते, शेवटी बेल यांना दूरध्वनी यंत्राचे पेटंट मिळाले.
बेल यांनी तयार केलेल्या आपल्या यंत्राचे प्रयोग अमेरिकेत आणि युरोपमध्ये केले. त्यानुसार नोव्हेंबर १८७७ साली बेल यांना बर्लीन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. १८८५ साली बेल यांनी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून ओळखली जावू लागली. सुरुवातीला बेेेलला महाविद्यालये आणि विद्यापिठाकडून असंख्य मानद पदव्या मिळाल्या.
२ ऑगस्ट १९२२ या दिवशी बेल यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून समस्त अमेरिकेतील दूरध्वनी संच एक मिनीट बंद ठेवण्यात आले.
*संकलन*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती श्रेष्ठ.
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) महिला टी - २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा २०२३ चे विजेतेपद कोणी पटकावले ?
२) २६ जानेवारीच्या संचलनाची मानवंदना कोण स्वीकारतात ?
३) भारताचा पहिला कॉम्पुटर कोणत्या राज्यात सुरू झाला ?
४) शहाजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते ?
५) जीवनसत्त्व क - चे रासायनिक नाव काय आहे ?
*उत्तरे :-* १) ऑस्ट्रेलिया २) राष्ट्रपती ३) कोलकाता ४) वडील ५) अस्कर्बिक एसिड
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*
👤 सुरेश कटकमवार
👤 दादाराव कदम
👤 सुरजकुमारी गोस्वामी
👤 युनूस अली सय्यद
👤 साईनाथ संभाजी नुतिवाड
👤 अनिल गड्डम
👤 गोविंद चव्हाण
👤 एकनाथ पाटील
👤 बालासाहेब इंगोले पाटील
👤 इरफान शेख
👤 जयश्री उमरीकर
👤 कैलास माधवराव गंगुलवार
*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
नसे अंतरी काम नानाविकारी। उदासीन जो तापसी ब्रह्मचारी॥ निवाला मनीं लेश नाही तमाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५०॥
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*सुगरणीची गोष्ट सर्वांना माहित असेल. सुगरणीचा नक्षीदार खोपा नर बांधतो. सुगरण या खोप्यात आनंदाने राहते. अंडी घालते आणि नंतर दुस-यासोबत उडून जाते. अशी बेवफाई जिव्हारी लागते. खेड्यापाड्यतल्या अनेक म्हातारा-म्हातारींची अवस्था अशीच आहे. ज्यांच्याकडे बघत स्वप्नांचे झुले बांधले ती अंगाखांद्यावर खेळलेली पाखरं पंख फुटल्यावर बेईमान होऊन कायमची उडून गेली खोप्याला मागे सोडून. जख्खड चोचीने भरवलेला दाणा, दुष्काळी झळांमध्ये चोचीत थेंब-थेंब ओतलेलं पाणी, कसं विसरून गेले सारं..!*
*या पाखरांना घरच्यांनीच मुभा दिली होती, दूरदेशी जाऊन चार दाणे चोचीत भरून आणतील या आशेवर भरवंसा होता. पण एकदा उडालेले पंख परतून माघारी फिरले नाहीत. म्हातारपण आजही त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलं आहे. हे त्यांचं वाट बघणं वेदनादायी आहे. सकाळी रानात सोडलेली गाय सांजेला दावणीला आली नाही तर तिच्या ओढीने व्याकूळ वासरू टिपं गाळत हंबरतं. ते काळीज पिळवटून टाकतं, तसंच यांचं मूकपणे वाट पाहणं, हुंदका गिळून गहिवरणं. आपल्याच माणसांनी झोळीत टाकलेलं लाचारपण घेऊन निराधाराचे रडगा-हाणे कोणाला सांगणार ? आपल्या मोडक्या, गळक्या कुडाची इज्जत गहाण ठेवून थकलेले, भागलेले हताश पाय कशीबशी वाट चालतात. पाखरांची परतीच्या दिवसाची खुळी आशा मनात घेऊन वाट पाहता पाहता पडक्या घराच्या मुंडारीवर उगवलेले गवत वाळुन जाते पण पाखरं ...परततच नाहीत...???* 😢😌
••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
शिशिर ऋतू आला की,
निसर्गाची चांगली असलेली कळा ही अवकळा येऊन रुक्ष वातावरणात रुपांतर होते. चहूकडे नैराश्यच नैराश्य पहायला मिळते.
त्यामुळे सा-या सृष्टीचा नूरच बदलून जातो. पण निसर्गाला माहित आहे की हेही दिवस संपणार आहेत. आनंदाचे नि चैतन्याचे दिवस येणार आहेत. त्यासाठी येणा-या वसंत ऋतूची वाट पहावीच लागणार आहे. आशा आहे म्हणून तर निसर्ग पुन्हा पुन्हा बहरतो. त्याचप्रमाणे जीवनाचेही तसेच आहे.
आज जरी दुःख, वेदना
सहन केल्या तरी उद्याच्या सुखाची अपेक्षा आहे ती पूर्ण होणारच. पण
त्यासाठी आजचे होणारे
दुःख काही काळासाठी भोगावे लागणारच आहे.
वर्तमानाला जर सावरले तर भविष्य उज्वलच होणारे आहे याची तर थोडी प्रतीक्षा करावीच लागेल.
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद...९४२१८३९५९०.
🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
एका अरण्याच्या मध्यभागी एक मोठे सागवानाचे झाड उंच आणि सरळ वाढले होते. ते नेहमी आपल्या मोठेपणाच्या गर्वाने आपल्या खाली वाढलेल्या लहान झाडांचा धिक्कार करत असे. त्या झाडांमध्ये एक काटेझाड होते. सागवानाच्या झाडाचा गर्विष्ठ स्वभाव न आवडल्याने त्याने एकदा त्याला स्पष्ट विचारले, 'बाबा रे, तू एवढा गर्व कशासाठी करतोस ?' त्यावर तो म्हणाला, 'मी सर्व झाडांमध्ये श्रेष्ठ शोभिवंत आहे. माझ्या फांद्या ढगांना भिडल्या आहेत. त्या सतत हिरव्या टवटवीत असतात व तुम्ही अगदीच क्षुद्र आहात, जो येईल तो तुम्हाला पायाखाली तुडवतो. माझ्या पानांवरून जे पावसाचे पाणी वाहते त्यात तुम्ही बुडून जाता.' हे ऐकून काटेझाड म्हणाले, 'ते सगळे काही असू देत, पण मी तुला एकच गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेव. जेव्हा लाकूडतोड्या तुझ्या बुंध्यावर कुर्हाडीचा घाव घालायला येईल, त्या वेळी आमच्यातल्या अगदी हलक्या झाडांच्या स्थितीशीही तू आपल्या स्थितीची अदलाबदल करायला तयार होशील.
*तात्पर्य* - मोठेपणाच्या मागे अनेक दुःखे असतात, ती लहानपणा मागे नसतात, तेव्हा त्यांचा धिक्कार करू नये.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें