10/03/2022
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 10/03/2023
💠 वार - शुक्रवार
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
● १८४९ - अब्राहम लिंकन यांचा पेटंट साठी अर्ज; अमेरिकन राष्ट्रपतींचा पहिलाच असा अर्ज.
● १८७६ - पहिला दूरध्वनी संपर्क (अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ने थॉमस वॅटसन शी संपर्क साधला).
💥 जन्म :-
● १८१२ - विक्टर तेश, बेल्जियन वकील व कायदा मंत्री.
💥 मृत्यू :-
● १९१३ - हॅरियेट टबमन, अमेरिकन क्रांतिकारी.
● १८९७ - सावित्रीबाई फुले
● १९९८ - लॉईड ब्रिजेस, अमेरिकन अभिनेता.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *शिंदे-फडणवीस सरकारची बजेट एक्स्प्रेस सुस्साट; फडणवीसांचा पहिल्याच चेंडूवर षटकार, केंद्राच्या धर्तीवर राज्याचाही सहा हजारांचा कृषी सन्मान निधी; शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना, पंचामृत अर्थसंकल्पातून देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *एसटी बस तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत; मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार देणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *राज्यात मेट्रोचं जाळं पसरणार, या वर्षाच्या शेवटी आणखी 50 किमीची मेट्रो मुंबईच्या सेवेत, मुंबईतल्या नव्या मेट्रो मार्गाची अर्थसंकल्पात घोषणा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *दवाखान्यात आता पाच लाखांपर्यंत उपचार मोफत, महात्मा फुले योजनेची व्याप्ती दीड लाखावरुन पाच लाखांपर्यंत, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार रुपयांची वाढ, 20 हजार पदं भरणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *संत तुकाराम बीजेला भाविकांची देहूमध्ये गर्दी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *हास्य अभिनेते सतिश कौशिक यांचे दिल्लीत निधन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *अटीतटीच्या लढतीत गुजरातने आरसीबीचा 11 धावांनी पराभव केला.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*बालपणीचे संस्कारक्षम गोष्टी*
http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/01-26.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले*
सावित्रीबाईनी ज्योतीबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथना आश्रय मिळवा हि त्याची कार्यक्षेत्र त्यांच्या श्रद्धेने प्रभावी झाली . सामजिक कार्यात पुढाकार घेणे हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळेच १८७६ – ७७ मधल्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाने बळी ठरल्या. आणि १० मार्च १८९७ मध्ये त्यांना मृत्यू आला. समाजातल्या दिनदलितांना मायेने जवळ करणाऱ्या, स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपडनाऱ्या सावित्रीबाई खर्या अर्थाने ज्योतिबाच्या सहचारणी म्हणून शोभल्या . त्याच्या थोर सामजिक कार्य विषयाची कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
*संकलन*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) हॉकी इंडियाने भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती केली आहे ?
२) महाराष्ट्रातील कोणत्या संताची पदे 'गुरू ग्रंथसाहेब' या शीख धर्मियांच्या धर्मग्रंथात आहेत ?
३) जागतिक ध्रुवीय अस्वल दिवस केव्हा साजरा केला जातो ?
४) छत्रपती शिवाजी महाराज कोणता किल्ला जिंकू शकले नाही ?
५) नांदेड जिल्ह्यात एकूण महानगरपालिका किती आहेत ?
*उत्तरे :-* १) क्रेग फुल्टन, दक्षिण आफ्रिका २) संत नामदेव महाराज ३) २७ फेब्रुवारी ( २०११ पासून ) ४) जंजिरा किल्ला ५) एक
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*
👤 दत्तप्रसाद पांडागळे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक परिषद
👤 शिवराज सावंत, सहशिक्षक, रत्नागिरी
👤 वीरभद्र मिरेवाड, सहशिक्षक तथा कवी
👤 साईनाथ शिरपूरे, भाजपा कार्यकर्ता
👤 नागनाथ लाड, सहशिक्षक, कुंडलवाडी
👤 विठ्ठल नवाथे, सहशिक्षक, सायखेड
👤 संतोष पवार
👤 उमाकांत बांगडकर
👤 शिवाजी जाधव, साहित्यिक, मरखेल
👤 तुळशीराम सिरमलवार, सहशिक्षक
👤 माधव आप्पा पडोळे, येवती
*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
दिनाचा दयाळू मनाचा मवाळू। स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू॥ तया अंतरी क्रोध संताप कैंचा। जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५६॥
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*अनेक उच्चपदस्थ, उच्चभ्रू म्हणवले जाणारे प्रतिष्टित सुर्यास्ताबरोबर स्वत:ला काचेच्या पेल्यात बुडवतात. तरूण मुला-मुलींपुढे कुठले आदर्श आपण ठेवणार आहोत ? कोवळी, मिसरूड फुटलेली मुलं अलिकडे व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यांना कुणीतरी थांबवलं पाहिजे. त्यांची शक्ती विधायक कार्यासाठी संघटित व्हायला हवी. जगाची दारं आज त्यांच्यासाठी खुली आहेत. त्यांनी त्या दारापर्यंत पोहोचायला हवं.*
*खरं म्हणजे आनंद-दु:ख, यश-अपयश व्यक्त करण्याची अनेक माध्यमं आहेत. मदिराप्राशन, हे माध्यम उचित ठरू शकत नाही. प्रत्येकानं मात्र आवडीचा छंद जोपासण्याची धुंदी चढू द्यावी. श्रमण्यातून मिळालेल्या यशाचा कैफ काही औरच असतो. दुस-याच्या दु:खानं गुंगी जरूर यावी नि, ती सोडविण्याचा अंमलही असावा. प्रेमाचा वर्षाव करत झिंगावं त्यानं आप्त-मित्रांसह, आणि जगण्याची खरी... नशा.. चढू द्यावी...!*
••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
स्वप्न पहायला परिश्रम,वेळ आणि पैसा कधीच लागत नाही परंतु पाहिलेली स्वप्ने साकारण्यासाठी वेळ, परिश्रम आणि पैसा हा लागतोच तेव्हा कुठे स्वप्न पूर्ण होतात.केवळ स्वप्नांना कल्पनेत न ठेवता ती प्रत्यक्षात उतरावयाची असतील तर हे तुम्हाला करावेच लागेल.अन्यथा स्वप्न स्वप्नच राहतील.
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद...९४२१८३९५९०.
🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*हरिण व कोल्हा*
एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.'
तात्पर्यः 'दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.'
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें