20/01/2023
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 20/01/2023
💠 वार - शुक्रवार
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
💥घडामोडी
● २००९ - बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी
● १९९८ - पं. रवि शंकर यांना पोलार संगीत पुरस्कारजाहीर.
● १९९९ - गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
💥जन्म
● १८७१ - सर रतनजी जमसेटजी टाटा, भारतीय उद्योगपती
💥मृत्यू
● १९५१ - अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बापा’, गुजराती समाजसेवक.
● १९८० - कस्तुरभाई लालभाई, भारतीय उद्योगपती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक .
● १९८८ - खान अब्दुल गफार खान, पश्तुन नेता, स्वातंत्र्यसेनानी.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास: पंतप्रधान मोदी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *काँग्रेसचा मोठा निर्णय, सत्यजीत तांबे यांचं अखेर निलंबन, मविआचे 5 मतदारसंघातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *कोरेगाव भीमा प्रकरणी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होणार, जे एन पटेल आयोगासमोर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये चौकशी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *बारामतीचे कृषी प्रदर्शन पाहून भारावलो, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून राजेंद्र पवार यांचं कौतुक*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *दिलासादायक! पुढच्या 24 तासात थंडीचा जोर कमी होणार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *ऑलिम्पिक धावपटू उसेन बोल्ट अतिप्रचंड वेगात झाला कंगाल! खात्यातून तब्बल 98 कोटी गायब*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा आणि युवा फलंदाज शुभमन गिल यांचा लवकरच होणार साखरपुडा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
*🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆*
*व्हिडीओ-लिंक👇*
https://youtu.be/pZy6_cKk1iM
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
*सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*पाऊलवाट : शिक्षण क्षेत्रातील एक दिशादर्शक पुस्तक*
वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.
http://nasayeotikar.blogspot.com/2016/11/blog-post_23.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*सर रतनजी जमसेटजी टाटा**
सर रतनजी जमसेटजी टाटा ( जन्म २० जानेवारी १८७१ - मृत्यू ५ सप्टेंबर १९१८ ) हे भारतीय उद्योगपती आणि दानशूर होते.
हे जमसेटजी टाटा यांचे पुत्र असून त्यांच्या मृत्यूनंतर रतनजी आणि दोराबजी या भावांनी जमसेटजींचे उद्योग सांभाळले.
यांनी अनेक ऐतिहासिक वस्तू एकत्र केल्या होत्या. १९२३मध्ये या वस्तू टाटांच्या कुटुंबियांनी प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाला (आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय) दान केल्या.
टाटांच्या मृत्यूनंतर १९१९ साली सर रतन टाटा ट्रस्ट ही समाजकारणी संस्था ८० लाख रुपयांसह (आताचे ७५ कोटी रुपये) स्थापन झाली.
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) हॉकी विश्वकप स्पर्धेत २०० गोलचा टप्पा पार करणारा भारत कितव्या क्रमांकाचा संघ ठरला आहे ?
२) ९ जानेवारी १९१५ ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले या दिवसाची आठवण म्हणून भारतात कोणता दिवस साजरा केला जातो ?
३) महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो ?
४) केंद्रीय नारळ संशोधन केंद्र कोठे आहे ?
५) दरवर्षी भारतीय सैन्य दिवस ( आर्मी डे ) केव्हा साजरा केला जातो ?
*उत्तरे :-* १) तिसऱ्या २) प्रवासी भारतीय दिवस ३) पाच - कृष्णा, सावित्री, कोयना, वेण्णा व गायत्री ४) कासर्गोड, केरळ ५) १५ जानेवारी
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*
👤 किशोर पाटील, युनिक कॉम्प्युटर्स, धर्माबाद
👤 शंकर बेल्लूरकर
👤 अहमद लड्डा सय्यद, पत्रकार
👤 संतोष शेटकार
👤 शरयू देसाई
👤 माऊली जाजेवार
👤 विशु पाटील वानखेडे
👤 नागनाथ दिग्रसकर
*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते। अकस्मात होणार होऊनि जाते॥ घडें भोगणे सर्वही कर्मयोगे। मतीमंद तें खेद मानी वियोगें॥१७॥
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*धावणे ही आजची कमालीची गरज झाली आहे. महानगरी, चाकरमाणी असो की खेड्यातला शेतकरी, 'कशासाठी पोटासाठी' करीत तो सकाळपासून रात्रीपर्यंत अविश्रांत धावतो. असाध्य ते साध्य करणे हे त्याचे पोटाच्या पुढचे ध्येय असते. प्रपंचाच्या जबाबदा-यांचे पालन करता करता त्याला धावण्याची एवढी सवय होते की तो थांबणे विसरूनच जातो. 'पाॅज' नावाची मनाला आणि शरीराला उभारी देणारी, ताजेपणा देणारी युक्ती आपणही स्वीकारू शकतो, हेच त्याच्या स्मरणापलीकडे जाते.*
*'जीवन फार धकाधकीचे झाले आहे' हे वा अशाप्रकारची वाक्य आता गुळगुळीत झालीत. कारण त्यातील अर्थ सर्वमान्य झाला आहे. मात्र, हे धकाधकीचे जीवन अल्पकालीन ठरू नये, यासाठी 'चार युक्तीच्या गोष्टी' मधील एक गोष्ट 'क्षणभर विश्रांती' ची आहे, हे लक्षात घेऊन त्याचा अंगिकार होणे आवश्यक आहे.*
••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
प्रत्येक व्यक्ती हा आपल्या विशिष्ट ध्येयाकडे जात असताना प्रत्येक पावलागणिक विचार करत असतो.आपले काम यशस्वीपणे पार पडणार का ?जर पार पडत नसेल तर अजून काही करावे लागते का? असे जेव्हा अनेक प्रश्न पडतात तेव्हा आपल्या मनात कुठेतरी आत्मविश्वास कमी आहे असे वाटायला लागते.असा आत्मविश्वास कमी असल्याचा भास कमी होऊ देऊ नका.कारण तुम्हालाच तुमचे काम पूर्ण करायचे आहे तेव्हा तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका किंवा डळमळीत होऊ देऊ नका.मी हे काम पूर्ण करणारच आणि पूर्ण झाल्याशिवाय सर्वार्थ बसणार नाही असा सकारात्मक दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर आणि प्रत्येक पुढे पाऊल टाकताना करा.नक्कीच तुम्हाला त्यात यश मिळेल यात शंकाच नाही.
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद...९४२१८३९५९०.
🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*कोल्हा आणि नगारा*
एकदा एक कोल्हा भुकेने व्याकूळ होऊन जंगलात इकडे तिकडे फिरत होता. तेवढ्यात त्याला मोठा आवाज ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने कोल्हा चांगलाच घाबरला. पण तो आवाज कोणता प्राणी काढतोय या उत्सुकतेपोटी दबकत दबकत आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. तर त्याच्या नजरेस एक मोठा नगारा पडला. त्या नगार्यावर एका झाडाची फांदी वार्यामुळे आपटत होती. त्यामुळे तो मोठा आवाज येत होता. हे कोल्ह्याच्या लक्षात आल्यावर कोल्हा नगार्यावर आपला पंजा मारून लागला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की नगार्याचे कातडे गुंडाळले आहे. ते ओरबाडले तर आत भरपूर मांस असेल. त्यामुळे निदान दोन दिवसांची तरी भूक शमेल. देवाची कृपा समजून त्याने नगार्याचे कातडे कुरतडून फाडले तर... आत काहीच नाही. नुसता पोकळ नगारा बघून कोल्हा दु:खी झाला, पण कातडे कुरतडताना त्याच्या दाढाही दुखावल्या.
उपदेश : प्रसंग आनंदाचा किंवा भीतीचा असला तरी जो शहाणा माणूस मागचा पुढचा विचार करून वागतो त्याला पश्चात्ताप करण्याची पाळी येत नाही.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें