18/01/2023
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 18/01/2023
💠 वार - बुधवार
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
१९५६ - संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार. १० ठार, २५० जखमी, औद्योगिक विभागात दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू. मुंबईच्या पाच काँग्रेस आमदारांचा राजीनामा
💥 जन्म :-
१८४२ - न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, अर्थशास्त्रज्ञ,समाजसुधारक,राजनीतीज्ञ.
१८८९ - नाट्यछटाकार दिवाकर लेखक.
१८९५ - विठठ्ल दत्तात्रय घाटे प्रसिद्ध लेखक
१९७२ - विनोद कांबळी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
💥 मृत्यू :-
१९८६ - प्राचार्य नारायण गोपाळ तवकर, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक
२००३ - हरिवंशराय बच्चन, हिंदी साहित्यिक.
१९४७ - कुंदनलाल सैगल, भारतीय अभिनेता, गायक.
१९६७ - डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *सुमारे 10 हजार लोकांना प्रत्यक्षपणे रोजगार मिळणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *दाओसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्याला 45 हजार 900 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *सोन्याच्या दरांत विक्रमी उसळी; 28 महिन्यांचा रेकॉर्ड मोडीत; प्रतितोळ्याचा दर 57 हजारांच्या आसपास*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *धनुष्यबाणासाठी शिंदे आणि ठाकरेंमध्ये निर्णायक सामना होण्याची शक्यता*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *शेअर बाजारातील अस्थिरतेला लगाम; Sensex 562 अंकांनी तर Nifty 158 अंकांनी वाढला*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *40 व्या वर्षी माजी सैनिकानं MPSC परीक्षेत मिळवलं यश, खासदार सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *फुटबॉलचा सच्चा कार्यकर्ता हरपला, गरीब मुलांना प्रशिक्षण देणाऱ्या सुरेंद्र करकेरा यांचे निधन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
*🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆*
*व्हिडीओ-लिंक👇*
https://youtu.be/rj1i0r8ni5E
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
*सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*एका शेतकऱ्याची आत्मकथा*
वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.
http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_25.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*महादेव गोविंद रानडे*
(जानेवारी १८, इ.स. १८४२ - जानेवारी १६, इ.स. १९०१), माधवराव रानडे व न्यायमूर्ती रानडे नावाने प्रसिद्ध, हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील न्यायाधीश होते. इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्षही होते.
महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिकमधील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांना शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली आणि पुढे ती वाढली. लहानपणी माधवराव अबोल आणि काहीसे संथ होते. मात्र त्यांची तीव्र स्मरणशक्ती, सामाजिक भान इतरांच्या लक्षात आले होते. १८५६नंतर ते आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले, एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांचे इंग्रजी-संस्कृत भाषांमधील वाचन वाढले. लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी 'मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष' या विषयावर निबंध लिहिला. पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले. अफाट वाचनाने त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती.
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांनी ( ३१७ धावा ) विजयी झालेला संघ कोणता ?
२) हॉकी विश्वकप स्पर्धा २०२३ मध्ये एकूण किती संघांनी भाग घेतले आहे ?
३) प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याची संकल्पना कोणी मांडली ?
४) जम्मू काश्मीर या राज्यातून कलम ३७० केव्हा हटविण्यात आले ?
५) तीर्थक्षेत्रांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वे विभागाने अयोध्या ते नेपाळमधील जनकपूर दरम्यान कोणती विशेष गाडी सुरू होणार आहे ?
*उत्तरे :-* १) भारत २) १६ संघ ३) लक्ष्मीमल सिंघवी ४) ५ ऑगस्ट २०१९ ५) भारत गौरव
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*
👤 श्रीमती विजया वाड, प्रसिद्ध साहित्यिक
👤 पी. आर. कमटलवार, धर्माबाद
जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
👤 रामनाथ खांडरे, करखेली
👤 त्र्यंबक आडे, नांदेड
👤 महेश गोविंदवार, सहशिक्षक, माहूर
*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी। जितां बोलती सर्वही जीव मी मी॥ चिरंजीव हे सर्वही मानिताती। अकस्मात सांडूनिया सर्व जाती॥१५॥
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*आयुष्याच्या वाटेवर आपल्याला अनेक माणसं भेटत असतात. पण कधी कधी कुणी आपलं असं भेटतं आणि आयुष्यच बदलून जातं. त्या व्यक्तिसोबत आपलं छान नातं जुळतं. पण काहीवेळा गोष्टी आपल्याला हव्या तशा होत नाहीत, हे नातं नकोसं वाटू लागतं, कधी वाटतं की ते नातं जमवणं हेच जरा घाईत झालं होतं.*
*या कटू घटनेचा घोट तर पचवावा लागतोच. पण जास्त त्रास होतो तो जोडीदाराला माफ न करण्याने, प्रत्येक नात्यात काही ना काही तक्रारी असतातच. पण जेव्हा आपण आपले विचार, भावना मनातल्या मनात कोंडतो, तेव्हा आपली समीकरणं कुठेतरी चुकत जातात.*
••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
आपले विचार लोकांपर्यंत पोहचवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातला भित्रेपणा नष्ट करुन आत्मविश्वासाने बोलण्यासाठी किंवा विचार व्यक्त करण्यासाठी लोकांसमोर उभे राहिले पाहिजे.दुसरी गोष्ट आपण काय बोलणार आहोत त्यात सत्यता असली पाहिजे कारण लोक सत्य काय आहे आणि किती सत्य आहे ह्याकडे लोकांचे तुमच्याकडे लक्ष असते. आपल्यावर कुणीही आक्षेप घेणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. आपल्यामध्ये स्पष्टपणा आत्मविश्वास,सकारात्मक परिणामकारकता आणि सत्यता असल्यामुळे भ्यायची गरज नाही.मग आपोआपच आपल्यातला भित्रेपणा नष्ट व्हायला लागतो.भीती वाटते केव्हा आपल्या विचारात सत्यता नसेल,स्पष्टपणा नसेल आणि लोकांना आपण काहीतरी म्हणून फसवत आहोत तर भीती आपल्यामध्ये राज्य करते. मग ती कधीही आपल्याला पुढे जाऊ देत नाही.
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद...९४२१८३९५९०.
🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*राक्षस, चोर आणि ब्राह्मण*
एका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजापाठ करून जे द्रव्य मिळेत, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या.
दानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं. एके काळी शिळी पोळी भाजी खाणार तो ब्राह्मण! गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला.
द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची अन् ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या, असा त्या चोराचा डाव होता. एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोराची गाठ एका राक्षसाबरोबर पडली. परस्परांनी एकमेकांना 'तू कुठे अन् का जातोस,' ते विचारलं.
चोर म्हणाला, 'मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे. पण तू कुठे चालला आहेस?'
अरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. ह्या ब्राह्मणानं मंत्र-तंत्र करून माला दूर घालवायचं, माझं अन्न-पाणी तोडलंय, पण आज मी त्यालाच खाणार आहे झालं! दोघांचही लक्ष एक निघालं. दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला. तो चोर अन् राक्षस हे दोघं त्या ब्राह्मणाच्या दारांत आले. दोघांनीही घरात डोकावून पाहिले, तर तो ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता. राक्षस ब्राह्मणाला खायला जाणार, तोच चोर म्हणाला, अरे थांब! मी आधी दोन्ही गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा. त्यावर राक्षस म्हणाला, वा रे वा! मोठा शहाणाच आहेस की तू!
तू गायींना नेताना त्या हंबरल्या, तर तो जागा होणार नाही का ! मग मी काय करू?
राक्षसाचं हे म्हणणं चोराला पटेना अन् चोर आपली घाई सोडेना. असं करता-करता हळूहळू त्यांचे एकमेकांचे आवाज तापू लागले. परस्परांतला संवाद संपू लागला. अन् वाद-विवाद भांडणं चालू झाली.
त्यात त्या दोघांनी आपल्या मोठ्या आवाजचं भात राहिलं नाही. ते आवाज ऐकून गायी हंबरल्या. मोत्यानं भुंकायला सुरूवात केली. ब्राह्मणही झोपेतून जागा झाला. त्याने राक्षस अन् चोराला पकडून आरडा-ओरडा केला. त्या आवाजानं शेजारी मंडळी काठ्या, मशाली इ. घेऊन धावत आले. त्यांना पाहून राक्षस आगलील आणि चोर लोकांना पाहून धूम पळून गेला.
तात्पर्य : फुकट शब्दानं शब्द वाढवून वादविवाद करू नये. भांडणाने फायदा तर होणे दूरच, पण अनेकदा नुकसानच होते.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें