17/01/2023

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दिनांक :- 17/01/2023 💠 वार - मंगळवार ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १९५६ - बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा. २००१ - मध्य प्रदेश सरकारचा शास्त्रीय नृत्यासाठीचा कालिदास सन्मान रोहिणी भाटे यांना जाहीर. अपारंपारिक उर्जा क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एम.जी.ताकवले यांना जाहीर. 💥 जन्म :- १८९५ - विठ्ठल दत्तात्रय घाटे, मराठी लेखक, शिक्षणतज्ञ. १९०५ - दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, भारतीय गणितज्ञ. १९०६ - शकुंतला परांजपे, भारतीय समाजसेविका. 💥 मृत्यू :-  २००० - सुरेश हळदणकर, जुन्या पिढीतील गायक आणि अभिनेते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 1⃣ *पुण्यात 43 शाळा अनधिकृत, जिल्हा शिक्षण विभागाची माहिती, मुख्याध्यापकांवर कारवाई होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *भारतातल्या एक टक्के श्रीमंतांकडे 40 टक्के संपत्ती, कोरोनाकाळात अब्जाधिशांच्या संपत्तीत 121 टक्क्यांनी वाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नाशिक पदवीधरमध्ये 16, नागपूर शिक्षक मतदारसंघात 22 उमेदवार रिंगणात, मराठवाड्यात बंडखोरी; पाचही मतदार संघाच्या लढती ठरल्या* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुण्यात G20 परिषदेला सुरुवात, आंतरराष्ट्रीय संघटनांचे 65 प्रतिनिधी सहभागी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *जोशीमठ भूस्खलनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी फेटाळली, याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *हुडहुडी वाढली! राज्यात पुढील तीन दिवस थंडीचा कडाका कायम, नागरिकांना शेकोट्यांचा आधार, मुंबईत पारा घसरला; मोसमातील सर्वात कमी तापमान, पारा 13.8 अंशावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *जागतिक दर्जाच्या शेफ चॅलेंज स्पर्धेत सातारच्या मुलीचा डंका; चॉकलेटपासून मूर्ती घडवून स्पर्धेत आली पहिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆* *व्हिडीओ-लिंक👇* https://youtu.be/Y90B6J7shfo ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड* 📱9960217083 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       *साहित्यसेवा हेच खरे काम* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_76.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शकुंतलाबाई परांजपे* शकुंतलाबाई परांजपे या महाराष्ट्रातील समाजसेविका होत्या. त्यांनी भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, कुटुंबनियोजनाचा पुरस्कार केला. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून गणितात अधिस्नातक पदवी मिळवली होती. जन्म- १७ जानेवारी १९०६ पुणे मृत्यू- ३ मे २००० जोडीदार - युरा स्लेप्टझॉफ अपत्ये सई परांजपे पुरस्कारपद्मभूषण(१९९१) *व्यक्तिगत माहिती* रँग्लर परांजपे हे त्यांचे वडील होते. सई परांजपे ही त्यांची कन्या आहे. शकुंतलाबाई परांजपे या लेखिकाही होत्या. यांनी काही पुस्तके आणि नाटकेही लिहिली आहेत. *शकुंतलाबाई परांजपे यांनी लिहिलेली पुस्तके* अरे संसार संसार, काही आंबट काही गोड, दुभंग, निवडक शकुंतला परांजपे (संपादन - विनया खडपेकर), भिल्लिणीची बोरे ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *" शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• १) जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्ट असलेले पहिले तीन देश कोणते ? २) भारताने हॉकी विश्वकप स्पर्धेचे आयोजन कितव्या वेळेस केले आहे ? ३) ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 'महाराष्ट्र केसरी' ही मानाची गदा कोणी जिंकली ? ४) जगातील पहिले तृतीयपंथीय मुलांसाठी बालगृह कोणत्या शहरात उभारण्यात येणार आहे ? ५) 'प्रवासी भारतीय दिवस' दरवर्षी केव्हा साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया २) चौथ्या ३) पहलवान शिवराज राक्षे, पुणे ४) अमरावती, महाराष्ट्र ५) ९ जानेवारी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*       👤 जयप्रकाश भैरवाड, धर्माबाद 👤 शेखर घुंगरवार 👤 सचिन पाटील पार्डीकर  👤 धम्मपाल कांबळे 👤 यश चेलमेल 👤 राम घंटे 👤 मन्मथ भुरे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡••• ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला। परी शेवटीं काळमूखीं निमाला॥ महाथोर ते मृत्युपंथेचि गेले। कितीएक ते जन्मले आणि मेले॥१४॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।। ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *या पृथ्वीतलावर पर्वत, नद्या , स्थावर-जंगम आहे तोवर लोकसमूहात रामायणाची कीर्ती गाजत राहणार आहे.. या शब्दांत महर्षि वाल्मिकींनी रामायण कथेची कालातीत स्थिरता कोरून ठेवली आहे. या भूतलावरील प्रत्येक मानवी वृत्ती व प्रवृत्तीचं प्रातिनिधिक रूप या महाकाव्यात रंगविलं आहे. आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श सेवक, आदर्श राजा अशा आदर्शांचा प्रतिनिधी म्हणून श्रीरामाचं चरित्र आपल्यापुढं येतं. संतानी, भक्तांनी, कवींनी त्याला देवत्वाला पोहोचवलं आहे.* *रामायणातील अगतिकता नि वेदनांच्या आंतरिक संघर्षाच्या तळाशी पोहचल्याशिवाय श्रीरामाच्या मानव ते 'मर्यादा पुरूषोत्तम प्रभूराम' या देवत्वरूपाशी तादात्म्य पावताच येणार नाही. गदिमांनी गीतरामायणात प्रभूरामाच्या जीवनपटाचा माणूस म्हणून सारांश मांडताना अतिशय उत्कटतेने वलयांकित केलेले-*  *'दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा*   *पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.'* *हे श्रीरामाचं रूप आधिक यथार्थ वाटतं..*                          ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●•• 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵       *श्री. संजय नलावडे, मुंबई*       *मोबाइल  - 9167937040* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ज्यांचे मन आणि बुद्धी सक्षम असतील तर त्यांनी करत असलेले विचारही सक्षम असतात कारण की,अशा विचारांमुळे स्वत:च्या जीवनाबरोबर इतराच्यांही जीवनाचा सकारात्मक विचार करायला तो तयार असतो.त्याच्या मनात इतरांबद्दल वाईट भावना कधीच येत नाहीत.पण ज्यांचे मन आणि बुद्धी जर सक्षम नसतील तर ते मन आणि बुद्धी वाईट विचार करायला लागते.त्यातस्वत:चे आणि इतरांचे चांगले होत आहे की वाईट होत आहे ह्याचा विचारही त्याच्या मनाला आणि बुध्दीला स्पर्श करत नाही. अशावेळी भरकटलेल्या मनाला आणि बुध्दीला आपल्या वशमध्ये ठेवण्यासाठी शांत आणि संयमी वृत्ती जोपासायला हवी.हा स्वभाव जर विकसित केला आणि जोपासला तर आपले मन आणि विचार सकारात्मक दृष्टिकोनाच्या मार्गाने मार्गक्रमण करत आहेत असे समजावे. अशामुळे स्वत:चे आणि इतरांचेही कल्याण होईल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *घामाचा पैसा* धन्नाशेटचा मुलगा राम अगदीच आळशी. घरांत गडगंज संपत्ती. एकुलता एक लाडाचा. काम कधी करावंच लागलं नाही. आता २१ वर्षाचा झाला. शेठजींना काळजी पडली. याचे कसे होणार साठलेला पैसा किती दिवस पुरेल. दुसरे दिवशी त्यांनी मुलाला बोलावले व म्हणाले हे बघ आज तू सकाळीच बाहेर जा. काहींतरी काम करून पैसे मिळवुन आण तरच तुला जेवायला मिळेल' मुलाला काहीच कळेना. तो बहिणीकडे गेला तिने त्याला एक रूपया दिला. शेठजींनी तो विहीरीत फेकून दिला. दुसर्‍या दिवशी आईकडून घेतला तिसर्‍या दिवशी मात्र कोणीही पैसे द्यायचे नाहीत हे उमजल्यावर स्वारी घराबाहेर पडली स्वारी घराबाहेर काम शोधायला निघाली. पण काय काम करणार ? बारा वाजे पर्यंत हिंडला. काम मिळेना. पोटात कावळे कोकलायला लागले. स्टेशनवरून एक जड बॅग घेऊन येणारा माणूस दिसला त्याला हमाल हवा होता. हा धावत पुढे गेला. 'साहेब, इकडे आणा'. ती बॅग त्याने डोक्यावर उचलली. घामाघूम झाला. साहेबांनी आठ आणे हातावर ठेवले. घरी आला. शेठजींच्या हातावर आठ आणे ठेवले. दोन दिवसाप्रमाणेच शेठजींनी ते विहीरीत फेकले हा चवताळून उठला. 'बाबा अहो तेवढे आठ आणे मिळवायला मला किती वणवण करावी लागली आणि तुम्ही ते फेकून दिलेत ?' शेठजींनी त्याला जवळ घेतले. पाठीवरून हात फिरवला, 'बाळा आता मला काहीं काळजी नाहीं कारण खर्‍या कष्टाची किंमत तुला आज कळली. दोन दिवस ह्याच्या दुप्पट रक्कम फेकली पण तुला राग आला नव्हता कारण त्या मागे कष्ट नव्हते.' स्वकष्टाची कमाई तीच खरी कमाई *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in •••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

10/03/2022

20/01/2023

13/02/2023