12/01/2023
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 12/01/2023
💠 वार - गुरुवार
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*राष्ट्रीय युवक दिन*
💥 ठळक घडामोडी :-
१९३६ - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा.
इ.स. २००६ - हज यात्रेच्या अखेरच्या दिवशी मक्केजवळ मीना येथे प्रतीकात्मक दगड फेकण्याचा विधी चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३४५ मुस्लिम भाविकांचा मृत्यु व २९० जखमी.
💥 जन्म :-
१५९८ - छत्रपती शिवाजी राजांची आई राजमाता जिजाबाई
१८६३ - भारतीय तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद,
१९०२ - धुंडिराजशास्त्री विनोद,महर्षी न्यायरत्न.
१९०६ - महादेवशास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे व्यासंगी संपादक.
१९१८ - सी.रामचंद्र, ज्येष्ठ संगीतकार.
१९१७ - महाऋषी महेश योगी, भारतीय तत्त्वज्ञ.
💥 मृत्यू :-
१९४४ - वासुकाका जोशी, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त.
१९९२ - पंडित कुमार गंधर्व, हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रातील ख्यातनाम गायक.
२००५ - अमरीश पुरी, भारतीय अभिनेता.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच 40 हजार पदांची भरती*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; सेंद्रीय आणि देशी बीजोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी शिखर संस्था स्थापन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *भीम अँप आणि रुपे डेबिट कार्डसाठी मोदी सरकारची मोठी योजना, 2600 कोटींची तरतूद*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *मुंबई ते अलिबाग अंतर अवघ्या 15 मिनिटात ! ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरपासून होणार खुला*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *'ऑस्कर' सारख्या प्रतिष्ठीत पुरस्काराच्या नामांकन यादीत 'मी वसंतराव'चा समावेश होणं अभिमानास्पद : निपुण धर्माधिकारी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून नागो गाणार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी, आज भरणार अर्ज*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *मुंबई आणि आसाम यांच्यातील रणजी ट्रॉफी सामन्याचा पृथ्वी शॉ चे त्रिशतक*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
*🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆*
*व्हिडीओ-लिंक👇*
https://youtu.be/bo1oFJXBWAY
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
*सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*राजमाता जिजाऊ जयंती विशेष*
*आई असावी जिजाऊसारखी*
जिजाबाई शहाजीराजे भोसले यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. राजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील तर आईचे नाव म्हाळसाबाई
वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.
http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_11.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*स्वामी विवेकानंद*
स्वामी विवेकानंद (जानेवारी १२, १८६३ - जुलै ४, १९०२) हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त (नरेंद्र, नरेन) असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.कलकत्त्यातील सिमलापल्ली (सिमुलिया, उत्तर कोलकाता) येथे जानेवारी १२, १८६३, सोमवारी सकाळी ६:३३:३३ वा. (पौष कृष्ण सप्तमीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला.(जानेवारी १२, १८६३ हा दिवस योगा योगाने मकर संक्रती चा होता .) बाळाचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील)अॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा वाटा होता. नरेन्द्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्यानी विशेष आवड दाखवली. त्यांना शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच त्यांनी व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्यानी लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इ. छंद होते.
सौजन्य :- इंटरनेट
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) 'राष्ट्रीय युवा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?
२) वनस्पतीमध्ये टाकाऊ पदार्थ कोठे साठवले जातात ?
३) कोणता त्रिभुज प्रदेश 'हरित त्रिभुज प्रदेश' म्हणून ओळखला जातो ?
४) अमेरीकेत पहिल्या शीख महिला न्यायाधीश बनण्याचा बहुमान कोणाला प्राप्त झाला ?
५) राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था कोठे आहे ?
*उत्तरे :-* १) १२ जानेवारी २) पानांमध्ये ३) गंगा ब्रम्हपुत्रा त्रिभुज प्रदेश ४) भारतीय वंशाची मनप्रीत मोनिका सिंग ५) भोसरी, पुणे
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*
👤 सुधाकर थडके, सहशिक्षक
संचालक, सहकारी पतपेढी, नांदेड
👤 डी. बी. शेख, लोहा
👤 कन्हैया भांडारकर, गोंदिया
👤 रत्नाकर जोशी, साहित्यिक, जिंतूर
👤 सुरेश गभाले
👤 भारत राठोड
👤 नागनाथ भिडे
👤 गणेश पाटील भुतावळे
👤 अरशद शेख
👤 नरेश परकोटवार
👤 अमरदीप वाघमारे
👤 राहुल दुबे
*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।
दुःखाची स्वयें सांडि जीवी करावी॥
देहेदु:ख ते सूख मानीत जावे।
विवेके सदा स्वस्वरुपीं भरावें ॥१०॥
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*आपल्या सर्व संत मंडळींनी जे जीवनाचे सार आणि सार्थक सांगितले ते अध्यात्मविद्येच्या जोरावर सांगितले आहे. 'आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ विवेका' असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे. संतानी सांगितलेले अध्यात्म हे वरवरचे नाही. ते गहन आहे. आपण आपले रोजच्या जगण्यातले एखादे काम जर तन्मयतेने करत असू तर तिथेही अध्यात्म प्रकट होत असते; त्यासाठी अध्यात्म या शब्दाचा व्यंगार्थ लक्षात घ्यावा लागेल.*
*ज्याला या विद्येचे गमक कळले त्यालाच वैराग्य साधता येते. या संकल्पना दूर कुठेतरी जाऊन अनुसरणे कुणाला मान्य नाही. मी वर्गात जाऊन शिकवितो, त्यावेळी 'शिकविणे' या क्रियेशी मी किती तादात्य पावतो हा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने स्वत:ला विचारला पाहिजे. आसपासच्या सगळ्या गोष्टी विसरून जर शिकविणे या एकाच क्रियेशी मी जोडला गेलो, तर माझ्याकडून होणारे काम पाहून विद्यार्थी तृप्त होतील. तीच तृप्तता मला अध्यात्माचा नवा धडा देणारी असेल. त्यातली अतृप्ती मला ज्या दिशेने घेऊन जाईल त्या स्थळीही मी स्वत:चा शोध घेतला पाहिजे, तरच वैराग्याचा अर्थ आकलनात येईल.*
••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
सागरातल्या रौद्ररुप धारण केलेल्या लाटांकडून फायद्याची अपेक्षा कधीच करु नये,कारण त्यांच्याकडून नुकसानच होते.ते कधीही शांत नसतातच.अशा सागरी लाटांपासून सावध रहा असा संदेश सागर किनारी असणा-या लोकांना इशारा दिला जातो.त्याचप्रकारे रौद्ररूप धारण करणारी माणसेदेखील सर्वसामान्यपणे जीवन जगणा-या माणसांचे कोणत्याही वेळी नुकसानच करतात.याउलट शांत आणि एका लयीमध्ये सागरातून किना-याकडे येणा-या लाटा सागराचे आणि किना-याचे सौंदर्य वाढवतात.ते कधीही कुणाचे नुकसान करत नाहीत. म्हणून माणसाने रौद्ररूप धारण करणा-या लाटांपेक्षा शांत तरंगणा-या लाटांप्रमाणे जीवनात स्थान निर्माण करुन सुंदर आयुष्य घडवावे आणि सुखी समाधानी व्हावे.जीवनात खुप काही सकारात्मक जीवन जगण्याची अपेक्षा निर्माण होते.
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद...९४२१८३९५९०.
🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*बुझणारा घोडा*
एका घोड्याला आपल्याच सावलीत बुझण्याची सवय होती. ही सवय जावी म्हणून त्याच्या स्वाराने बराच प्रयत्न केला. शेवटी काटेरी लगाम घालून पाहिला, पण तरीही त्याची सवय जाईना. तेव्हा तो स्वार घोड्याला म्हणाला, 'मूर्खा, सावली म्हणजे तुझीच सावली. तुझ्या शरीरातून प्रकाश आरपार जात नाही म्हणून सावली पडते. सावलीला दात नाहीत; पंजे नाहीत अन् तुझ्यासारख्याच्या आडही ती येऊ शकत नाही, तर मग तू तिला भितोस का?' घोड्याने उत्तर दिले, 'अहो कोणी कितीही मोठा झाला तरी त्याला कशाना कशाची तरी भीती वाटतेच. तुम्ही माणसं स्वप्नात भीता किंवा अंधारात एखाद्या लाकड्याच्या ओंडक्याला पाहून घाबरता ते काय म्हणून ? तिथे तरी तुमच्या कल्पनेशिवाय तुम्हाला घाबरवणारं कोणी असतं काम ?'
*तात्पर्य* : - मी हसे लोकांना आणि शेंबूड माझ्या नाकाला.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें