09/01/2023
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 09/01/2023
💠 वार - सोमवार
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
💥 ठळक घडामोडी :-
२००१: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.
२००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.
२००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.
२००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.
💥 जन्म :-
१९२२: जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हरगोबिंद खुराना
१९३४: पार्श्वगायक महेंद्र कपूर
💥 मृत्यू :-
१९२३: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर
२००३: गीतकार व कवी कमर जलालाबादी
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *परदेशी भूमीवर दिसणार 'नारीशक्ती', पायलट अवनी चतुर्वेदीची गगन भरारी; भारताला मिळणार नवी ओळख*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *उत्तराखंडमध्ये जोशीमठमधील 500 घरांना तडे, पंतप्रधान मोदींनी दिलं मदतीचे आश्वासन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *बदलत्या वातावरणाचा हळद पिकाला फटका; महाराष्ट्रात करपा रोगामुळं शेतकरी चिंतेत, अनेक जिल्ह्यात धुक्याची चादर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *बिहारमध्ये शनिवारी जातीनिहाय जनगणना सुरु झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रात देखील जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *सरकारने जारी केलेल्या अहवालानुसार अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे की बीएसएनएल एप्रिल 2024 पर्यंत त्यांची 5G सेवा सुरू करेल*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी झाली निवड*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *3 सामन्यांची ही वनडे सिरीज खेळवली जाणार असून 10 जानेवारी रोजी पहिली वनडे होणार आहे. दरम्यान या वनडे सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माचे कमबॅक*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
*🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆*
*व्हिडीओ-लिंक👇*
https://youtu.be/jE5SQ1jz6dY
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
*सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*जनसेवेतच ईश्वराचीही सेवा*
माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करता.........
वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.
http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*पार्श्वगायक महेन्द्र कपूर*
(९ जनवरी १९३४-२७ सितंबर २००८)
हिन्दी फ़िल्मों के एक प्रसिद्ध पार्श्वगायक थे। उन्होंने बी आर चोपड़ा की फिल्मों हमराज़, ग़ुमराह, धूल का फूल, वक़्त, धुंध में विशेष रूप से यादगार गाने गाए। संगीतकार रवि ने इनमें से अधिकाश फ़िल्मों में संगीत दिया।
महेंद्र कपूर का जन्म अमृतसर में हुआ था। पार्श्वगायन में कैरियर बनाने के लिए वे कम उम्र में ही मुंबई आ गए थे। 1953 की फिल्म ‘मदमस्त’ के साहिर लुधियानवी के गीत आप आए तो खयाल-ए-दिल-ए नाशाद आया से उन्होंने फिल्मी करियर की शुरुआत की थी। २७ सितंबर २००८ को बीमारी से लड़ने के पश्चात उनका देहावसान हो गया।
*पुरस्कार और सम्मान*
1963 - फिल्मफेयर पुरस्कार (पुरुष पार्श्वगायन) - चलो इक बार फ़िर से (ग़ुमराह)
1967 - फिल्मफेयर पुरस्कार (पुरुष पार्श्वगायन) - नीले गगन के तले (हमराज़)
1974 - फिल्मफेयर पुरस्कार (पुरुष पार्श्वगायन) - नहीं नहीं (रोटी कपड़ा और मकान)
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*" विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. "*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) भारतीय सैन्यात भरती होणारी पहिली महिला कोण ?
२) ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स २०२२ मध्ये पहिल्या क्रमांकाचे तीन देश कोणते ?
३) 'सुपर मॉम' ह्या नावाने कोणती भारतीय महिला खेळाडू परिचित आहे ?
४) सूर्यकिरणांमधील कोणती किरणे जंतुनाशक असतात ?
५) इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी कोणत्या कंपनीची स्थापना केली होती ?
*उत्तरे :-* १) प्रिया जिंघन २) स्वित्झलंड, अमेरिका, स्वीडन ३) मेरी कोम ४) अल्ट्राव्हायोलेट ५) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ( इ. स. १६०० )
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*
👤 सुहास अनिल देशमुख
👤 माधव नरवाडे
👤 आमिर अली शेख
👤 अजित राठोड
👤 राजेश रामगिरवार
👤 गजानन सोनटक्के
👤 सुप्रिया ठाकूर
👤 श्याम कुमारे
👤 विष्णुकांत इंगळे
👤 शिवकुमार पंतुलवार
👤 हमीदसाब शेख
👤 चालू अर्गे
*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥७॥
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*एका शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कुत्रा या विषयावर निबंध लिहायला सांगितला. अनेक विद्यार्थ्यांनी छान ओळी लिहिल्या होत्या. एका विद्यार्थ्याने कुत्र्याचं अवघं जीवन सुंदर शब्दात रंगवलं होतं. या इमानदार प्राण्याला अनेक ठिकाणी कसं हलाखीचं जीवन जगावं लागतं..? 'कुत्र्याच्या मौतीनं मेला' हा वाक्प्रचार कसा तयार झाला हेही त्यानं लिहिलं. कुणीही निबंध वाचला असता, तर डोळ्यांत पाणी आलं असतं. शिक्षक त्याच्यावर फार खुश झाले.*
*शाळेतून सुटल्यावर तो मुलगा आपल्या मित्रांसोबत घरी चालला होता. काही अंतरावर ते शिक्षकही चालले होते. बाजूने एक कुत्री आपल्या दोन-तीन पिल्लांसह चालली होती. मुलं त्या पिल्लांना दगड मारत होती. पिल्ल केकाटत होती. त्यांच्या केकाटण्याचा सूर ऐकुण मुलं चेकाळून आणखी दगड मारत होती व हसत होती. हे सर्व करण्यामध्ये तो उत्तम निबंध लिहिणारा मुलगा आघाडीवर होता. हे सारं शिक्षकांनी पाहिलं. त्यांना विषाद वाटला. दुस-या दिवशी त्या मुलाला बोलावून घेतले. "तुला कुत्र्या विषयीचं ज्ञान चांगलं आहे, ते तुझ्या निबंधात दिसलं; पण तुझी कृती त्या ज्ञानाप्रमाणे नाही हे मी काल स्वत:च पाहिलं. निष्पाप कुत्र्याच्या पिल्लांना दगड मारून तू हसत होतास." त्यानं आपली चूक कबूल केली.*
*"मुलाला ज्ञान होतं, पण त्याचं ज्ञान कर्मशील झालं नाही. त्याचं कर्म ज्ञानवान नव्हतं, हे शिक्षकांनी दाखवून दिलं."*
••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
जीवनात जशी चांगल्या विचारांची गरज आहे तशीच चांगल्या माणसांच्या सहवासाची गरज आहे.हे दोघेही आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असून ते आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत.यांना कधीही अंतर देऊ नका.
त्यांची आपल्याला कोणत्याही कठीण प्रसंगी सामोरे जाण्यासाठी गरज लागते.परंतु गरजेपुरता वापर करत असताल तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी कठीण होऊन बसेल.त्यांना आपल्या नात्यांप्रमाणे जपायला हवे.
तरच तुमचे जीवन कृतार्थ बनेल.
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद...९४२१८३९५९०.
🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*छोटी-छोटी बातें*
पूर्व काल में घोडे का बहुत महत्व था। घोड़ों के पैरों मे नाल ठोंका करते थे। एक बार एक सवार ने कुछ दुर्लक्ष किया। उसके घोड़े की एक नाल का एक कीला निकल गया था। वह कुछ ही क्षणों का छोटा सा काम था; परन्तु उसने वह नहीं किया। संयोगवश उस दिन उसे एक महत्वपूर्ण संदेशा पहुंचाने का कार्य दिया गया। शत्रु सेना पर एक ही समय दोनों तरफ से आक्रमण करना निश्चिनत हुआ। किस समय किस ढंग से सेना का दूसरा भाग आक्रमण करेगा, इसकी विस्तृत सूचना लिखकर वह लिफाफा इस सवार को दिया गया। उसे वह दूसरे सेनापति को पहुंचाना था। वह लिफाफा लेकर घोड़े पर सवार हुआ। उसने अपने घोडे को बहुत तेजी से दौड़ाया। आधा अंतर उसने पार कर लिया होगा, तभी एकाएक नाल की और दो कीलें ढीली हो गयीं और नाल सर्र से बाहर निकल आयी। घोड़ा पूर्ण वेग से दौड रहा था। बाहर निकली हुई नाल किसी वृक्ष मूल में अटकी और घोडा अपने सवारी सहित धड़ाम् से गिर पडा। घोड़े के मर्मस्थल पर चोट लगने से वह वहीं मर गया। सवार घायल हुआ। बेहोश भी हुआ। थोडी देर के बाद उसे होश आया। घोडे को मरा पा कर उसे बहुत दुख हुआ। वह उठा और लंगडाते-कराहते भागने लगा। उसे महत्वपूर्ण संदेशा जो पहुंचाना था, उसने बहुत प्र यास किया परन्तु वह निर्धारित स्थान पर ठीक समय पर नहीं पहुंच सका। अतः व्यूह रचना असफल हुई। उसका देश युद्ध में हार गया, एक छोटी सी कील के कारण।
कील न ठुकाई, घोडा मरा।
स्वार न पहुंचा देश हारा॥
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें