07/02/2023
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 07/02/2023
💠 वार - मंगळवार
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌹🌹*रोज - डे*🌹🌹
💥 ठळक घडामोडी :-
२००३ - महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शक रमाकांत आचरेकर यांना जाहीर.
💥 जन्म :-
१९३८ - एस. रामचंद्रन पिल्ले, भारतीय कम्युनिस्ट पक्षातील नेता
💥 मृत्यू :-
२००३ - जीवनराव सावंत, ज्येष्ठ कामगार नेते.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
*🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆*
*व्हिडीओ-लिंक👇*
https://youtu.be/QnSfhbSbnzs
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
*सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *मुंबईतील कोस्टल रोडला भारतरत्न लता मंगेशकर यांचं नाव द्या, मंगेशकर कुटुंबीयांची सरकारकडे मागणी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *अभिमानास्पद ! भारताच्या रिकी केज यांनी तिसऱ्यांदा कोरलं ग्रॅमी पुरस्कारावर नाव*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *केंद्र सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक, देशभरातील एसबीआय, एलआयसीच्या कार्यालयांसमोर आंदोलन, राज्यातही निदर्शनं*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *भारताचा चीनवर 'डिजिटल स्ट्राईक', 200 हून अधिक चिनी ॲप्सवर बंदी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कसब्यात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांचं नाव जाहीर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *तुर्कस्तान की भूकंपस्थान... गेल्या 24 तासात तुर्कीला भूकंपाचे तब्बल 39 धक्के, 1700 हून अधिक मृत्यू*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्र संघानं मारली बाजी, मुलींच्या गटात तामिळनाडू विजयी*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*हसा आणि हसवा*
जीवनात हसण्याचे महत्व ....!
वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.
http://nasayeotikar.blogspot.com/2015/11/blog-post_29.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*रमाकांत आचरेकर*
हे मराठी क्रिकेट प्रशिक्षक आहेत. भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचे मार्गदर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. ७ फेब्रुवारी २००३ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला. २०१० साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
संकलन
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*" धैर्य हे प्रेमासारखे आहे. नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते. "*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) २०२३ या वर्षाची जागतिक कॅन्सर दिनाची थीम काय आहे ?
२) 'द मॉर्निंग कन्सल्ट' या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते कोण ठरले आहेत ?
३) खनिज लोखंडापासून शुध्द लोखंड तयार करतांना क्षपणक म्हणून काय वापरतात ?
४) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे ?
५) टी - २० च्या एका सामन्यात भारताकडून सर्वाधिक वैयक्तिक धावा कोणी काढल्या ?
*उत्तरे :-* १) क्लोज द केअर गॅप ( कर्करोगावरील उपचारात येणारे अडथळे कमी करणे.) २) पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत ३) कोक ४) तिरुअनंतपुरम, केरळ ५) शुभमन गिल ( १२६ धावा )
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*
👤 पवन गट्टूवार, सहशिक्षक, कुंडलवाडी
👤 संतोष कोयलकोंडे, सहशिक्षक, देगलूर
👤 पोतन्ना चिंचलोड, येवती
👤 विनायक गोविंदराव पारवे
👤 खंडू येरकलवाड, बेळकोणी
👤 साईनाथ येनगंटीवार
👤 कवी बी. एल. खान
*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
समर्थाचिया सेचका वक्र पाहे।
असा सर्व भुमंडळी कोण आहे॥
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३०॥
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*मानवी जीवनाचा प्रवास वर्तुळासारखाच आहे. तो जेथून सुरू होतो तेथेच शेवटी संपतो. मग या प्रवासात अनेक क्षण, प्रसंग येतात, सुख-दु:खांना कवेत घेऊन... माणूस चालतो निर्धारानं. थांबतो क्षणभर उसंतीसाठी नि पुन्हा चालतो संकल्पांसाठी. वर्तुळाचा एक फेरा पूर्ण झाला की पुन्हा सुरू होतो वर्तुळाच्या दुस-या फे-याचा प्रवास.*
*परंतु जीवनाचं वर्तुळ कधीच पूर्ण होत नाही. पुढ सरकताना रोमांचित होणारं मन मागे सरताना उगीचच व्यथित होतं. भावनांचा कल्लोळ मनात साठवून इंच इंच पल्ला गाठताना अनेकदा वाट्याला येतो जीवघेणा संघर्ष. त्या संघर्षातून निर्माण होणारी निराशा अडवू पाहते जीवनाच्या गतीला. कधी मागे तर कधी पुढे एक पाऊल सरकताना लक्षात येतं की आपण जिथं होतो तिथंच पुन्हा उभं आहोत.*
••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
सुख आणि दुःख हे प्रत्येक मानवी जीवनातले दोन वेगवेगळे रंग आहेत.सुखाच्या रंगात सारेच मिसळून जातात.त्यात एवढे रंगून जातात की,दुस-याची आठवणसुद्धा येत नाही.इतरांना आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या प्रयत्नातही नसतात.एवढा अपार आनंद होतो.पण दु:खाचे तसे नाही.दु:खात मात्र त्याला सगळ्यांचीच आठवण येते.आपल्याला अशावेळी आपल्याजवळ कुणीतरी यावं आणि दिलासा द्यावा असं वाटतं.दु:ख पचविण्याची ताकत त्याच्यामध्ये कमी असते.म्हणून अशावेळी आपल्या मदतीला कुणीतरी यावं यासाठी धावा करतो.अशावेळी मात्र आपल्यापासून आपले आणि इतरही लोक दूर जातात.परंतू एक लक्षात ठेवायला हवे,सुखाच्यावेळी आपण कुणाला विचारले नाही मग दु:खाच्यावेळी कसे बरे विचारतील ? म्हणून माणसाने सुख असो वा दु:ख असो दोन्ही समान मानून सदैव पाठीशी रहावे.एकमेकांच्या मदतीला धावून जावे.हाच सुखदु:खाचा मानवी जीवनव्यवहार आहे.हा व्यवहार आपल्या व इतरांच्या जीवनात समानतेने व्हावा एवढेच ज्ञात असावे.
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद...९४२१८३९५९०.
🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*अंतःकरणातील दुःख*
एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन्ह खात बसल्या असता त्यापैकी एकजण दुसरीस म्हणाली, 'आमची स्थिती मोठी शोचनीय आहे ! आम्ही फक्त जिवंत आहोत एवढंच, बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो ! यापेक्षा रानातल्या वार्यासारख्या उड्या मारणार्या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती !' हे बोलत असताच एक हरिणामागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने प्रत्यक्ष पाहिला. त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणार्या पहिल्या घोरपडीला म्हणाली, 'ज्या हरणाचं जीवन आपल्याला मिळावं अशी इच्छा तू करीत होतीस त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे, हे आता प्रत्यक्षच पाहा अन् ज्या मोठेपणाबरोबर अनेक दुःखही भोगावी लागतात तो मोठेपणा देवाने आपणास दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान !'
*तात्पर्यः*
*बाह्य रूपावर जाऊन फसू नये, कारण त्याच्या अंतर्यामी दुःख असण्याचीच शक्यता असते.*
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें