07/01/2023

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दिनांक :- 07/01/2023 💠 वार - शनिवार ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-  १७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले. १९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले. 💥 जन्म :- १८९३: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज १९२०: लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर १९२१: अभिनेते चंद्रकांत गोखले १९२५: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात १९४८: विदुषी व लेखिका शोभा डे 💥 मृत्यू :-  २०००: विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 1⃣ *पारा घसरला, महाराष्ट्र गारठला; कुठे थंडी तर कुठे धुक्याची चादर, राज्यात काही भागात ढगाळ वातावरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्यात 1432 वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे मंजूर, राज्य शासनाचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *लाच घेताना किंवा कोणत्याही गुन्ह्यात पकडलं तरी नावं अन् फोटो छापू नका; अधिकारी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नाशिक, परभणीमध्ये शिंदे गटाकडून ठाकरे, महाविकासआघाडीला नवीन भगदाड; राऊत दौऱ्यावर असतानाच 50 जणांचा जय महाराष्ट्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *परदेशातील विद्यापीठांना भारतात कॅम्पस सुरु करण्यास यूजीसीची मान्यता, प्रवेश फीचं स्वातंत्र्य, आरक्षणाचीही अट नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *कोविडनंतर पुन्हा विठ्ठल रुक्मिणी नित्यपूजेसाठी बुकिंग सुरु , विठुरायाच्या पूजेसाठी 25 हजार तर रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी 11 हजार रुपये शुल्क* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *देशात XBB व्हेरियंटचे सात रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 2503 वर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🏆गोष्टींचा शनिवार- तूच आहेस का सुतारपक्षी🏆* *व्हिडीओ-लिंक👇* https://youtu.be/J6J8bdtnsIc ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड* 📱9960217083 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *एकच ध्यास ; वाचन विकास* शिक्षण प्रक्रियेतील वाचन हे एक प्रमुख कौशल्य आहे. ज्यावर विद्यार्थ्यांची भविष्यातील प्रगती अवलंबून असते. भाषा विकासातील श्रवण व भाषण यानंतरचा टप्पा म्हणजे वाचनकौशल्याचा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टुअर्ट रिची यांनी आपल्या संशोधनात असे म्हटले आहे की, मुलांची वाचन क्षमता आणि त्याला किती लहान वयात वाचन करता येते त्यावर त्याची पुढील प्रगती अवलंबून ........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_6.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *चंद्रकांत रघुनाथ गोखले* चंद्रकांत रघुनाथ गोखले (जानेवारी ७, इ.स. १९२१, मिरज, सांगली संस्थान - जून २०, इ.स. २००८, पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्यअभिनेते, चित्रपट अभिनेते आणि गायक होते. मराठी अभिनेत्री कमलाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र विक्रम गोखले हे देखील अभिनेते आहेत. यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी  भावबंधन,  राजसंन्यास,  पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष  ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या. सौजन्य :- इंटरनेट ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *" परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• १) जागतिक इनोव्हेशन इंडेक्स २०२२ मध्ये भारताने कितवे स्थान पटकावले ? २) युद्धग्रस्त युक्रेनला सर्वाधिक मदत कोणत्य देशाने केली ? ३) शासकीय कर्मचाऱ्यांना ई - पेमेंट सुविधा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? ४) त्वचारोग कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो ? ५) नंदूरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे ? *उत्तरे :-* १) ४० वे २) अमेरिका ३) ओडिशा ( २० ऑगस्ट २०१२ ) ४) 'अ' जीवनसत्त्व ५) सातपुडा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*       👤 कुणाल पवारे, शिक्षक तथा पत्रकार       सामना, कुंडलवाडी शहर प्रतिनिधी *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡••• ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना लोभ हा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥६॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।। ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *अलीकडे असण्यापेक्षा दिसण्यावर लोक जास्त लक्ष देतात. सुंदर दिसण्याचा मार्ग सुंदर असण्यातून जातो; हे न कळल्यामुळे दर महिन्याचा काॅस्मेटिकवरचा खर्च आतोनात वाढलेली कुटुंबे सर्वांच्या आसपास मोठ्या प्रमाणात आहेत. मेकअपपेक्षा मनाच्या मेकओव्हरची गरज आहे; हे त्यांना कुणीतरी सांगायला हवे. योगासने केल्याने, पालेभाज्या, फळे खाल्ल्याने आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्याने तुम्ही दिवसभर तजेलदार राहता. एक सात्विक उर्जा कायम आपल्या आत दर क्षणी नव्याने जन्म घेत असते. मग कोणत्याही काॅस्मेटिकची गरज पडत नाही. तारूण्य सतत आपल्या आत उमलते; परिणामी आपण कांतिमान दिसतो.* *तेजस्वीता, तत्परता आणि तन्मयता हे तारूण्याचे तीन 'त' कार असतात. या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे. तो 'तरूण'! आज लौकिक अर्थाने तरूण असणा-यांकडे या तीन गोष्टी दिसतात का ? या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के, ठामपणे कुणालाही देता येणार नाही; कारण तशी परिस्थिती नाही. पिझ्झा-बर्गर हेच पूर्णान्न मानणा-या पिढीकडून तेजस्वीपणाची अपेक्षा ठेवणे वेडेपणाचे आहे.*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●•• 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵       *श्री. संजय नलावडे, मुंबई*       *मोबाइल  - 9167937040* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• सोन्यासारख्या मौल्यवान धातूंच्या सानिध्यात लोखंडासारखा एखादा तुकडा जरी आला तरी त्या तुकड्याला सोन्याचाच तुकडा समजायला लागतात.कारण सहवास सोन्याचा असतो म्हणून. अशाचपध्दतीने सज्जनांचा सहवासात साधारण माणसे जर आली तर त्यांच्यातील असणारे दुर्गूण सज्जनांच्या सहवासाने काही प्रमाणात कमी होऊन तेही सज्जन होण्यास कारणीभूत ठरतात. म्हणून आपल्यातील काही दुर्गूण असतील तर ते दूर होण्यास सज्जनांची संगतच हवी.जीवनात दुर्जनांच्या संगतीत राहण्यापेक्षा सज्जनांच्या संगतीत राहणे केव्हाही चांगले. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वतःमध्ये बदल* *कोकिळ पक्षी कधी स्वतः घरटे बांधत नाही. अंडी घालायची वेळ आली म्हणजे कोकिळा आपली अंडी एखाद्या कावळ्याच्या घरट्यात घालते. पिल्ले बाहेर पडून उडू लागेपर्यंत कावळा त्यांचे रक्षण करतो. एकदा एक कोकिळा एका घुबडाजवळ येऊन त्याला म्हणाली, 'घुबडदादा, हे कावळे किती दुष्ट आहेत पहा ! माझी अंडी पूर्ण विश्वासाने मी त्यांच्या स्वाधीन करतो. पण याबद्दल ते मला काय बक्षीस देतात पहा ! मी कुठेही एकटी सापडले तर ते माझा पाठलाग करून जीव नकोसा करतात. ही काय त्याची रीत झाली ?' घुबड म्हणाले, 'अग कृतघ्न कोकिळे, तुझ्या पिल्लांना तू टाकून दिलंस, त्यावेळी ज्या कावळ्यांनी मायेने त्यांना वाढवलं, त्यांचे उपकार तू विसरून जातेस, त्या अर्थी कावळे तुला टोचतात हेच योग्य.'* *तात्पर्य:- दुसर्‍याला उपदेश करण्या अगोदर आपल्यातील दोष दूर करून वागणूकीत बदल केलेला  कधीही चांगले असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in •••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

10/03/2022

20/01/2023

13/02/2023