05/01/2023

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दिनांक :- 05/01/2023 💠 वार - गुरुवार ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 💥ठळक घडामोडी ● १९४९ : राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए) पुणे येथे सुरु झाली. 💥जन्म ● १९२५ : रमेश मंत्री, मराठी साहित्यिक. ● १९१३ : श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक. ● १९५५ : प. बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ● १८९२ मराठीतील संशोधक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी  💥मृत्यू ● १९७१ : भारतीय जादूगार पी. सी. सरकार ● १९८२ : रामचंद्र चितळकर उर्फ सी.रामचंद्र, भारतीय संगीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 1⃣ *महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वीज कामगार संघटनांची चर्चा यशस्वी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची युती जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवणार, मेडिकल - इंजिनिअरिंगसह सर्व शिक्षण मराठीतून करण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विश्व मराठी संमेलनात घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सांगली जिल्ह्यातील आष्ट्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्याचा मार्ग अखेर मोकळा, प्रशासनाची पुतळ्याला परवानगी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *उपसरपंच निवडीसाठी सरपंचाना निर्णायक मताचा अधिकार देण्याविरुद्धच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या, सरपंचांचा मताधिकार कायम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, छातीला मार, धनंजय मुंडे एअर अॅम्ब्युलन्सने लातूरहून मुंबईत दाखल, ब्रीच कँडी रुग्णालयात होणार उपचार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *राज्यातील बास्केटबॉलपटूंचा मिनी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा, खेळाडूंना हायकोर्टाचा मोठा दिलासा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆* *व्हिडीओ-लिंक👇* https://youtu.be/KMMAbp4V8m0 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड* 📱9960217083 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *महान जादूगार पी. सी. सरकार* सरकार यांचा जन्म बंगाल (आजच्या बांगलादेशचा भाग)मध्ये टांगाईल जिल्ह्यातील अशेकपूर गावात झाला. 23 फेब्रुवारी 1913 ही त्यांची जन्मतारीख. त्यांचं नाव होतं प्रोतुल चंद्र सरकार. पण पीसी सरकार म्हणूनच त्यांची खरी ओळख निर्माण झाली. शिक्षणात त्यांना गती होती. गणितात तर त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे त्यांना जन्मजात प्रतिभेचे धनी म्हणूनही संबोधले जात होते. मात्र, त्यांचं मन जादूकडे होतं. सरकार यांनी शेवटच्या काळात त्यांचं आडनाव बदलून सॉरसर केलं होतं. इंग्रजी भाषेतील सॉरसरर म्हणजे जादूगाराच्या आवाजाशी मिळता जुळता होता. त्यांनी तरुण वयात क्लब, सर्कस आणि थिएटरमध्ये आपल्या जादूचे खेळ केले होते. सौजन्य :- इंटरनेट ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *" आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• १) चहामध्ये कोणते अपायकारक द्रव असते ? २) कोणताही वेबसाईट ओपन केल्यावर जे पहिले पेज दिसते त्याला काय म्हणतात ? ३) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली ? ४) धोत्र्याचे पान आणि बिजामध्ये कोणते विषारी अल्कलाईड असते ? ५) कंपन पद्धतीने भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ? *उत्तरे :-* १) टॅनिन २) होमपेज / इंडेक्स ३) ४ ऑगस्ट १९२३ ४) धनुरीन ५) जिओफोन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*    👤 जैपाल ठाकूर, गोंदिया 👤 अशोक कुबडे, साहित्यिक, नांदेड 👤 व्यंकटी केंद्रे, प्रा. शिक्षक, कंधार 👤 भाऊसाहेब चासकर, उपक्रमशील शिक्षक व लेखक 👤 गणराज गुरुपवार, नांदेड 👤 नितीन उत्तरवार 👤 राजकुमार बेरलीकर *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    ••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡••• ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ मना धर्मता नीति सोडूं नको हो। मना अंतरीं सार वीचार राहो ॥४॥ ।। जय जय रघुवीर समर्थ ।। ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• ● ‼ *विचारधन*‼ ● ••• ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मानवाचं मन... अनेक प्रकारचे सुखदु:खात्म प्रसंग, विवंचना, काळजा, आसूया, स्पर्धा, द्वेष, मत्सर, उत्सुकता आणि कुतूहल...यांनी सदैव त्याचे मन 'पिसाट' झालेले. अप्राप्याचा ध्यास म्हणजे आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याचा अथक प्रयत्न आपण सारे करीत असतो; पण 'मन:शांती' चा शोध घ्यायला नेमके विसरतो. 'मन:शांती' हे महत्वाचे जीवनसूत्र आहे, हेच आपण या सा-या धबडक्यात हरवून जातो. 'निरंजनी आम्ही बांधियेले घर' असे संतवचन आहे. ही निरांजनावस्था महत्वाची. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला सतत काही ना काही करावे लागते. यातून त्याची सुटका नाही. मनाची सर्वार्थाने मुक्तता तशी कठीणच. कारण वैयक्तिक भावभावना, विकार-विचार आणि अहंकार यापासून स्वत:ला अलग करणे जवळजवळ अशक्यप्राय.* *पाण्यात पडले म्हटले की कोणीही ओलाचिंब होणारच. मात्र एखादा खडक त्या जलाशयात असेल तर तो पाण्यात राहून अलिप्तच की ! अशी अलगता संसारात राहून साधायची, म्हणजे शरीरक्रिया चालू आहे पण मन मात्र अलिप्त आहे. त्याच्या पृष्ठभागावर कोणत्याच लहरी नाहीत, तरंग नाहीत. मनाच्या समधात अवस्थेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी 'नुरोनिया ठेला' असे केले आहे. म्हणजे बाह्यस्वरूपी तो इतका निश्चल की जिवंत आहे का, हा इतरांना प्रश्न पडावा, आणि तो जिवंत असला तरी जणूकाही जिवंत नाही, असे वाटावे असा... त्याच्या मनाच्या या अवस्थेला 'सहजस्थिती किंवा 'निजस्थिती' असेही त्यांनी म्हटले आहे. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...' नामापरते सुख नाही रे सर्वथा !' हाच तो सद्रगुरूपदेश...*         ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●•• 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵       *श्री. संजय नलावडे, मुंबई*       *मोबाइल  - 9167937040* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ज्या गोष्टीवर आपण गर्व करतो त्या गोष्टी म्हणजे सौंदर्य, पैसा, वेळ आणि नशिब. ह्या चारही गोष्टी माणसाला शेवटपर्यंत टिकत नाहीत आणि जे टिकतं ते चारित्र्य म्हणून चारित्र्याला अधिक जपणे गरजेचे आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *संस्‍कारीत मुलेच यशस्‍वी* नैतिक मूल्‍यांचे शिक्षण देणा-या एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेटस मागवली होती. त्‍यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेटस वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्‍या वर्गात येऊन पोहोचला व म्‍हणाला,''सर तुम्‍हाला आताच्‍या आत्‍ता प्राचार्यांनी काही महत्‍वाचे सांगण्‍यासाठी त्‍यांच्‍या कार्यालयात बोलावले आहे.'' शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्‍हणाले,'' मुलांनो मला काही कामासाठी प्राचार्यांकडे जावे लागत आहे. खरेतर ही चॉकलेटस मला माझ्या स्‍वत:च्‍या हाताने तुम्‍हाला द्यायची खूप इच्‍छा होती. परंतु मला जावे लागणार आहे. पाहिजे तर तुम्‍ही हाताने चॉकलेटस घेऊ शकता. अन्यथा मी परत आल्‍यावर तुम्‍हाला देईन'' ही चांगली संधी आहे. असा काही विद्यार्थ्‍यांनी विचार केला व त्‍यांनी चॉकलेटस स्‍वत:च्‍या हाताने घेऊन खाल्ली तर काही विद्यार्थ्‍यांनी शिक्षकांची वाट बघण्‍यात वेळ घालविला. शिक्षक परत आले व त्‍यांनी मुलांना विचारले,'' मुलांनो ज्‍यांनी ज्‍यांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस खाल्ली त्‍यांनी आपले हात वर करा'' ज्‍यांनी चॉकलेटस खाल्ली होती त्‍यांनी हात वर केले. मग शिक्षकांनी उरलेल्‍या मुलांना प्रेमाने चॉकलेटस वाटली. काही वर्षानंतर त्‍या शिक्षकांनी त्‍या विद्यार्थ्‍यांची माहिती मिळविली तेव्‍हा त्‍यांना असे दिसून आले की ज्‍या मुलांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस घेतले होते ती मुले सामान्‍य स्‍वरूपातील कामे करून उदरनिर्वाह करत होते तर ज्‍यांना शिक्षकांनी चॉकलेटस दिली ते सर्व विद्यार्थी उच्‍च पदावर काम करत होते. ही सर्व संस्‍कारांची देणगी होती. तात्‍पर्य :- संस्‍काराने माणूस घडतो. मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणे हे मानवाच्‍या हाती आहे. चुकीच्‍या मार्गाने गेल्‍यास व संयम न पाळल्‍यास योग्‍य संधी मिळूनही तिचा वापर करता येत नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in •••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

10/03/2022

20/01/2023

13/02/2023