03/01/2023
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣
( फ्रेश शालेय परिपाठ )
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
( रविवार आणि सुट्टी वगळून )
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎇 दिनांक :- 03/01/2023
💠 वार - मंगळवार
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*महिला मुक्ती दिन* *बालिका दिन*
💥 ठळक घडामोडी
⌛१९५२ : भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
💥 जन्म
⌛१९३१ : सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी.
⌛१९३१ : यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.
💥 मृत्यू
⌛२००१ : सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री, भारतीय राजकारणी.
⌛२००२ : सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ.
*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱 9604481084
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
1⃣ *जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून गोळीबार. गोळीबारात 3 नागरिक ठार तर 7 नागरिक जखमी. पोलिसांची माहिती.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
2⃣ *बार्शीतील फॅक्टरी स्फोट प्रकरणात अखेर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल, मालक युसुफ मणियार साथीदारासह फरार*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
3⃣ *नोटबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला मोठा दिलासा*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
4⃣ *पोलिस भरतीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी, भरती प्रक्रियेवर सीसीटीव्हीची नजर*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
5⃣ *वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यभरातील सात हजारपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर, आंदोलन मागे घेण्याचं सरकारचं आवाहन*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
6⃣ *'लाचखोर' शिक्षणाधिकारी किरण लोहारच्या संपत्तीचा आकडा पाहिल्यास येईल डोळ्यावर 'तार' ! 9 वर्षांच्या शासकीय सेवेत 50 कोटींची मालमत्ता.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
7⃣ *भारत आणि श्रीलंकेमध्ये आज पहिला टी 20 सामना या सामन्यात शुभमन गिल पदार्पण करण्याची शक्यता*
•••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️
*🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*🏆इंग्रजी शिष्यवृत्ती, व्याकरण व स्पर्धा परीक्षा तयारी🏆*
*व्हिडीओ-लिंक👇*
https://youtu.be/Lb3vjOFxIes
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🎥 व्हिडीओ निर्मिती -
*सारिका आचमे, नांदेड*
📱9960217083
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले*
यांच्या जयंती निमित्त प्रासंगिक लेख
http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/savitribai-phule.html
लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक
*नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
सतिश धवन (जन्म २५ सप्टेंबर १९२० – मृत्यू ३ जानेवारी २००२) यांचे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्यानंतर ISRO (Indian Space Research Organisation) चे १९७२ साली अध्यक्ष झाले. त्यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamicsच्या संशोधनाचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म श्रीनगरमधे झाला आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले.
त्यांनी ग्रामीण शिक्षण, Remote Sensing तसेच Satellite Communicationच्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले. त्यांच्या प्रयत्नांनी भारत INSAT - दूरसंचार उपग्रह, IRS - दूरसंवेद उपग्रह आणि PSLV - Polar Satellite Lanch Vehicle यासारखे प्रकल्प यशस्वी करू शकला. त्यांच्या स्मरणार्थ श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण स्थळाचे सतीश धवन अंतराळ केंद्र असे नामकरण करण्यात आले.
सौजन्य :- इंटरनेट
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*"शिक्षक हा विद्यार्थ्याचा दुसरा पालकच असतो. "*
*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*
📱 9403593764
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
१) 'बालिका दिवस' केव्हा साजरा केला जातो ?
२) कोणत्या जगप्रसिध्द फुटबॉलपटूची 'इनसाइड फॉरवर्ड' खेळणारा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू अशी ओळख आहे ?
३) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली ?
४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे नाव काय ?
५) '२६ डिसेंबर' हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?
*उत्तरे :-* १) ३ जानेवारी २) पेले, ब्राझील ३) सन १९४९ ४) हिराबेन मोदी ५) वीर बाल दिवस
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*
👤 ज्ञानेश्वर विजागत, शिक्षक
👤 वर्षा भोळे, नांदेड
👤 शुभांगी परळकर, नांदेड
👤 संदीप जाधव वसूरकर
👤 माधव पवार
👤 योगेश पाटील
👤 उत्तम जोंधळे
👤 राजेश पिकले
👤 डॉ. प्रशांत बोड्डेवाड, येवती
👤 विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद
*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• 💡 ‼ *मनाचे श्लोक*‼ 💡•••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥ जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥२॥
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
अखंड काम करणारी माणसं थकत नाहीत, याचे कारण त्यांचे कामावर प्रेम असते. ओव्हरटाईम करताना फक्त पैसा मनात नसतो, तर त्यात आपण अडचणीत कंपनीच्या उपयोगी येतो, हा ही भाव असतो. जिथे फक्त पैशांचा विचार होतो तिथे आयुष्यभर राबले, तरी पाठीवर शाबासकीची थाप मिळत नाही. उलट 'जन्माला आला...' या म्हणीप्रमाणे अवस्था होते. ज्यांना हे समजत नाही ती माणसे फक्त थकत जातात.
उत्साहाने भरलेला नवा दिवस त्यांच्या वाट्याला येत नाही. काम ढकलायचे एवढीच धारणा असते. स्वेच्छानिवृत्त, निवृत्त, आणि निवृत्तीनंतर काम करणारे या तीनही भागांमध्ये जे लोक येतात त्यांच्याशी कर्मावरची निष्ठा या विषयावर जर आपण बोललो, तर तिघांचीही उत्तरं भिन्न भिन्न असतात. एखादी भाजी करताना खूप कष्ट पडत असतील आणि नोकरीवरून आल्यावर एखाद्या गृहिणीने ती केली, तर ती नाही म्हणणार नाही; पण भाजीला चव मात्र नसेल. याचा अर्थ ज्या कृतीत मन नसते ती ढेपाळते, चुकते आणि मग थकवा देते. याकरीता दिवसभरात कमी काम झाले, तरी चालेल; पण ते मन:पुर्वक आणि निष्ठेने व्हावे. मग व्यक्तीचा आणि व्यक्तीच्या कामाचा विकास शक्य होतो.
••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
*श्री. संजय नलावडे, मुंबई*
*मोबाइल - 9167937040*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
माणसाचे मन हे नेहमी उमलणा-या फुलाप्रमाणे प्रसन्न ठेवायला हवे.फुले ही स्वत: उमलतात ती दुस-यांच्या दु:खाला दूर करण्यासाठी. फुलांचे जीवन अल्पायुषी जरी असले तरी माणसांच्या मनावर जास्त काळ राज्य करुन जातात हे मात्र खरे आहे.
© व्यंकटेश काटकर, नांदेड
संवाद...९४२१८३९५९०.
🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭
••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
*स्वातंत्र्य-पारतंत्र्य*
अमेरिकेत एकेकाळी गुलामगिरीची प्रचलित होती. निग्रो लोकांची शेळ्या मेंढ्यांप्रमाणे खरेदीविक्री होत असे. अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीची प्रथा मोडून काढण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे या प्रथेचा अंत झाला व निग्रो लोकांची गुलामीतून सुटका झाली. मुक्त झाल्यानंतर निग्रो लोकांनी रोजगाराचा शोध सुरु केला. एक वृद्ध, अशक्त वृद्ध निग्रो माणूस कामाच्या शोधात भटकत होता. पण त्याला काम काही मिळाले नाही. फिरून फिरून तो थकला व एके जागी बसला. तेथे त्याची भेट एका मालक जातीच्या ओळखीच्या माणसाबरोबर झाली. वृद्ध निग्रोची ती अवस्था पाहून तो माणूस म्हणाला,''तुझे हे होणारे हाल मला पाहवत नाहीत. तू कशाने इतका त्रस्त झाला आहे'' वृद्ध म्हणाला,''मला काम मिळत नाही'' तो माणूस म्हणाला,''काही दिवसांपूर्वी तर तुझी अवस्था चांगली होती.'' निग्रो म्हणाला,'' त्यावेळी मला बराच आराम होता. माझा मालक खूप दयाळू माणूस होता. मला तो फारसे काम लावत नसे. माझ्यावर अत्याचार करत नसे. कठीण कामे करण्यास लावित नसे.'' सहानुभूती दाखवून तो माणूस म्हणाला,'' अरे मित्रा मग तर ते गुलामीचे दिवसच चांगले म्हणायला हवे की, ही मुक्ती काही तुला मानवली नाहीये असेच दिसून येतेय. ती तुझ्या कोणत्याच कामी येत नाहीये.'' हे ऐकताच बसलेला तो निग्रो माणूस ताडकन उठून उभा राहिला व उंच स्वरात ओरडून बोलला,''मालक, गुलामगिरी स्वीकारण्यापेक्षा हे मुक्त जीवन हजारपट चांगले आहे. कारण आमच्या जीवनावर केवळ आमचाच अधिकार आहे; ते सावरण्यासाठी आम्ही स्वतंत्र आहोत. मालकाकडून पिंज-यात मिळणा-या पेरूच्या फोडी खाण्यापेक्षा उंच आकाशात उपाशीपोटी भरारी घेणे पोपटाला खूप आवडते हे लक्षात आहे ना.''
तात्पर्य :- मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्य ही पहिली अट आहे, पारतंत्र्य पतनाचे तर मुक्ती प्रगतीचे द्वार आहे.
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.
•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*
पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें